मराठवाड्याचा विचार करण्याची गरज - संभाजी निलंगेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 01:35 AM2018-09-25T01:35:49+5:302018-09-25T01:36:33+5:30

सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने मराठवाड्याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांनी पिंपळे गुरव येथे व्यक्त केले.

 Need to think about Marathwada - Sambhaji Nilangekar | मराठवाड्याचा विचार करण्याची गरज - संभाजी निलंगेकर

मराठवाड्याचा विचार करण्याची गरज - संभाजी निलंगेकर

Next

पिंपळे गुरव -  मागासलेल्या मराठवाड्यातील प्रत्येक गावातील तरुणांचा ओढा शहराकडे.., स्वातंत्र्य मिळाले तेही उशिरा.., कमी पाऊस म्हणून ओळख..., रोजगार कमी..., दुष्काळी भाग..., आदीबाबत सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने मराठवाड्याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांनी पिंपळे गुरव येथे व्यक्त केले. येथील निळूभाऊ नाट्यगृहात मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती व मराठवाडा जनविकास संघाने आयोजित केलेल्या ७०व्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कार्यक्रमामध्ये निलंगेकर बोलत होते.
निलंगेकर म्हणाले, ‘‘राज्यात कोळसा, तेल, इंधनाच्या अनेक खाणी आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यात ज्ञानाची खाण आहे. त्यामुळे भविष्यात काही कमी पडणार नाही. मराठवाड्यातील मुलांचे यापुढे शहराकडे स्थलांतर होणार
नाही. नैसर्गिक संकट येणार नाही. यासाठी दुष्काळमुक्त अभियान सुरु आहे. यासाठी मी काळजी घेणार आहे.’’
क्रांतिकारक व केरळ पूरग्रस्तांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी आमदार महेश लांडगे, विभागीय आयुक्त दीपक मैसेकर, झोन चारचे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्नाऊ, लातूरचे माजी आमदार शिवाजी कवेकर, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले, हभप शिवानंदमहाराज, हभप तुकाराममहाराज, हभप वाघमहाराज, माजी उपमहापौर शैलजा मोरे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, सागर अंगोळकर, बाबासाहेब त्रिभुवन, गोपाळ मळेकर, नगरसेविका उषा मुंढे, माधवी राजापुरे, शारदा सोनवणे आदी उपस्थित होत्या.
भाऊसाहेब जाधव, गौतम पंडागळे, भूषण कदम, अण्णा जोगदंड, रमाकांत जाधव, शांतिलाल मुथ्था आदींना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ यासह समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैष्णवी भोसलेच्या भारुडास व कृष्णाई केळकर यांचा महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमास रसिकांनी दाद दिली. संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संपत गर्जे यांनी सूत्रसंचलन केले. शिवाजी धोंगडे यांनी आभार मानले.

तोलून-मोलून बोला
मलाही खूप बोलता येते. मात्र उत्साहाच्या भरात तोलून-मोलून बोलले पाहिजे अन्यथा जाहीर माफी मागावी लागते. परिणाम भोगावे लागतात. त्यासाठी मी जाहीर भाषणातच रसिकांची माफी मागतो. कार्यकर्त्यांनी जास्त बोलण्याऐवजी ‘जयहिंद जय महाराष्ट्र’ म्हणावे, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी कार्यकर्त्यांना दिली.

Web Title:  Need to think about Marathwada - Sambhaji Nilangekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.