कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; आयुक्तांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 02:46 AM2018-09-17T02:46:13+5:302018-09-17T02:46:33+5:30

येत्या ३० दिवसांत कार्यपूर्तता अहवाल सादर करावा अन्यथा आपल्याविरोधात समन्स जारी करू,असा इशाराही दिला आहे.

Neglected labor issues; Notice to Commissioner | कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; आयुक्तांना नोटीस

कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; आयुक्तांना नोटीस

googlenewsNext

पिंपरी : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने महापालिकेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पिंपरी - चिंचवड महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे. येत्या ३० दिवसांत कार्यपूर्तता अहवाल सादर करावा अन्यथा आपल्याविरोधात समन्स जारी करू,असा इशाराही दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सागर चरण यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘महापालिकेमार्फत सफाई कर्मचाºयांना सुरक्षा साधने दिली जात नाहीत. मास्क, हातमोजे, गमबुट, बारा साबण, सहा मोठे हातरुमाल, दरमहा दोन झाडू नियमितपणे दिले जात नाहीत. पावसाळा संपला, तरी अजून रेनकोटचे वाटप केलेले नाही. महिला सफाई कर्मचाºयांना आरोग्य कोठीत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूम उपलब्ध नाही. तक्रारकर्त्या महिलांना अधिकारी अवमानकारक वागणूक देतात. सफाई कर्मचाºयांच्या वारसा नेमणुकीसाठी नेमलेल्या लाड - पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याकामी चालढकल केली जात आहे. पदोन्नती, अनुकंपा, वारसा नियुक्ती रखडली आहे. निवृत्तीनंतरच्या देय रकमा थकविल्या आहेत. सफाई कर्मचारी आणि त्यांचे पुनर्वसन कायदा २०१३ चे सर्रास उल्लंघन केले जात आहे. २५० हून अधिक सफाई कर्मचाºयांना मोफत घरकुलापासून वंचित ठेवण्यात आले आहे. याबाबतच्या सुमारे १०० हून अधिक तक्रारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केल्या. मात्र,त्यांनी त्याकडे काणाडोळा केला. गेली नऊ महिने पाठपुरावा करुनही आयुक्तांनी दाद दिली नाही.
नवी दिल्लीतील राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाकडे लेखी तक्रार करण्यात आली. अ‍ॅड.सागर चरण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयोगाच्या अध्यक्षांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रारींचा पाढा वाचला. त्याची तातडीने दखल घेत राष्ट्रीय आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली आहे.
सागर चरण यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. त्याबाबतचा कार्यपूर्तता अहवाल तीस दिवसात आयोगाला सादर करावा, अन्यथा दिवाणी न्यायालयाच्या अधिकारांचा वापर करत आपणास उपस्थित राहण्यासंदर्भात समन्स बजाविण्यात येईल याची दक्षता घ्यावी, असे नोटिशीत नमूद आहे.

सफाई कर्मचाºयांचा सत्कार का नाही?
महापालिकेत साफसफाईचे उत्कृष्ट काम करणाºया कर्मचाºयांना सप्टेंबर महिन्यात स्मृतिचिन्ह, श्रीफळ देऊन सत्कार केला जातो. गेली तीन वर्षे ही परंपरा सुरू आहे. यंदा त्यात खंड पडला. कोणाशीही चर्चाविनिमय न करता सफाई कर्मचाºयांचा सत्कार समारंभ पुढे ढकलल्याचे आरोग्य कार्यकारी अधिकाºयांनी अंतिम क्षणी सांगितले.
त्यासाठीचे कोणतेही सबळ कारण त्यांनी सांगितले नाही. सफाई कर्मचाºयांना दिल्या जाणाºया या अवमानकारक वागणुकीची तक्रार तीनही राष्ट्रीय आयोगांकडे केली. त्याची दखल घेत सफाई कर्मचाºयांचा सत्कार समारंभ महापालिकेने का घेतला नाही, याबाबतचा तथ्यात्मक अहवाल १५ दिवसांत सादर करावा, असा आदेश आयुक्तांना बजाविला आहे, असे अ‍ॅड. सागर चरण यांनी सांगितले.

Web Title: Neglected labor issues; Notice to Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.