वाढत्या हल्ल्यांचा केला निषेध
By admin | Published: May 9, 2017 03:51 AM2017-05-09T03:51:34+5:302017-05-09T03:52:56+5:30
पुरोगामी आणि लोकशाहीवादी कार्यकर्ते, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि महिलांवरील वाढत्या हल्ल्यांचा आणि जातीयवादी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पुरोगामी आणि लोकशाहीवादी कार्यकर्ते, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि महिलांवरील वाढत्या हल्ल्यांचा आणि जातीयवादी धर्मांध शक्तीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने येथे निदर्शने करून निषेध करण्यात आला.
पुणे येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात कामगार नेते अजित अभ्यंकर यांच्या नावाने जिवंत बॉम्बचे पार्सल पाठवून धर्मांध आणि जातीय शक्तींनी लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले आहे.
पुरोगामी, लोकशाहीवादी कार्यकर्ते, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, महिलांवर अत्याचार वाढत आहेत. मात्र, देशाचे पंतप्रधान ‘मन की बात’मध्ये संससेत खेद व्यक्त करीत नाहीत.
या वेळी नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, मार्क्सवादीचे शहर सचिव गणेश दराडे, अ. भा. जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा अपर्णा दराडे यांनी मार्गदर्शन केले. एस. के. पोनापन, सचिन देसाई,अविनाश लाटकर, सुषमा इंगोले, किशन सेवते, संजय ओव्हाळ, निर्मला येवले, जयश्री साळोखे, नंदा शिंदे, पार्वती ढवळे, सुनीता उघडे, संतोष सणस, मंगल डोळस, विमल चव्हाण, रेश्मा शेख, श्यामल
ओव्हाळ, रंजित लाटकर आदी उपस्थित होते.