भाजपमध्ये उफाळला नवा-जुना वाद

By admin | Published: January 24, 2017 10:49 PM2017-01-24T22:49:48+5:302017-01-24T22:49:48+5:30

भाजपमध्ये उफाळला नवा-जुना वाद

The new controversy arose in the BJP | भाजपमध्ये उफाळला नवा-जुना वाद

भाजपमध्ये उफाळला नवा-जुना वाद

Next

 

 

 उमेदवारीअर्ज दाखल करण्यास आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. मात्र, शिवसेना, भारतीय जनता पक्षाची युतीची केवळ चर्चा सुरू आहे. जागांवर चर्चा अडकली आहे. तर दुसरीकडे युतीबाबत भारतीय जनता पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. काही जण युती आवश्यक असल्याचे सांगतात, तर काही जण युती केल्यास कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे शहरातील पक्षाचे स्थान पाहून युतीचा निर्णय घ्यावा, असे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 

तसेच शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आणि माजी महापौर आझम पानसरे यांच्याच समर्थकांना उमेदवारी मिळणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते जाहीरपणे सांगत आहेत. त्यामुळे पक्षाचे मूळ कार्यकर्ते नाराज आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्या आणि नवीन कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांच्या दोन बैठका झाल्या. 

त्या वेळी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आझम पानसरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. एका बैठकीत खडाजंगी झाल्यानंतर ही बाब पालकमंत्र्यांच्या कानावर गेली. त्यांनी सायंकाळी साडेसात ते रात्री दहा या दरम्यान सोमाटणे फाटा येथे जुन्या कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेतली. 

सर्व्हेची भीती दाखवितात नवीन कार्यकर्ते

 पालकमंत्र्यानी तातडीची बैठक घेऊन चर्चा केली. जुन्या कार्यकर्त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. सध्या विविध प्रभागातून जुने ५० कार्यकर्ते आहेत. ते निवडून येऊ शकतात. परंतु नव्याने दाखल झालेले नेते इलेक्टिव्ह मेरिट आणि सर्व्हेची भीती दाखवत आहेत. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे. आजवर आम्ही पक्षाचे काम केले आता चांगले दिवस आले. मग बाहेरून आलेल्यांचे लाड कशासाठी सुरू आहेत. 

४यावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी कार्यकर्त्यांना शांत केले. ते म्हणाले, ‘‘पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. सर्वांनी पक्षवाढीसाठी काम करावे. आपापसातील मतभेद विसरून काम करावे. नवीन कार्यकर्त्यांनाही जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे. अशा सूचना देणार आहे. 

प्रस्ताव चर्चा आणि गोंधळ

 भाजपाच्या बैठकांमध्ये जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. या वेळी सर्व नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळणार असेल, तर जुन्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागे नये, असा संजय मंगोडेकर यांनी प्रस्ताव मांडला. त्यावर प्रमोद निसळ यांनी जुणे कार्यकर्ते म्हणजे कोण, असा प्रश्न उपस्थित केला. त्याच वेळी खापरे आणि राजेश पिल्ले यांच्यात शाब्दिक वाद झाले. त्या वेळी जगताप आणि पानसरे यांनी कार्यकर्त्यांना शांत केले. त्या वेळी खापरे यांनी घडला               प्रकार प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या कानावर  घातला.

 

Web Title: The new controversy arose in the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.