नव्या राज्यपालांनी राजकारण्यांचे बाहुले बनू नये; जयंत पाटलांची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 12:41 PM2023-02-13T12:41:02+5:302023-02-13T12:41:12+5:30

महाराष्ट्राची जनता राष्ट्रपुरूषांचा अपमान कधीही विसरणार नाही

New governors should not become puppets of politicians Expectation of Jayant Patel | नव्या राज्यपालांनी राजकारण्यांचे बाहुले बनू नये; जयंत पाटलांची अपेक्षा

नव्या राज्यपालांनी राजकारण्यांचे बाहुले बनू नये; जयंत पाटलांची अपेक्षा

googlenewsNext

पिंपरी : बारा विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्तीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खेळ केला. असा प्रकार महाराष्ट्रात यापूर्वी कधीही झाला नव्हता. नव्या राज्यपालांनी राजकारण्याचे बाहुले बनू नये, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

चिंचवड विधानसभेत आले असताना त्यांनी राज्यपालांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. जयंत पाटील म्हणाले, ‘‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्ये केली. त्यावेळी कधीही भाजपाने राज्यपालांच्या विधानाचा निषेध केला नाही. उलट महाविकास आघाडीच्या वतीने राज्यपालांचा निषेध केला. कदाचित त्यांना राष्ट्रपुरूषांचे अवमान मान्य असतील. विरोध करूनही तरीही भाजपाने राज्यपालांना बदलले नाही. आता त्या राज्यपालांनीच सांगितले आता बास झाले. कोश्यारी यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, महाराष्ट्राची जनता राष्ट्रपुरूषांचा अपमान कधीही विसरणार नाही.’’

बंडखोरीचा परिणाम होणार नाही

महाविकास आघाडीतील बंडोखोरीविषयी जयंत पाटील म्हणाले, ‘‘बंडरोखाराची दखल नागरीक घेत नाहीत. भाजपा विरूद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होणार आहे. बंडखोरीचा फरक पडणार नाही.

Web Title: New governors should not become puppets of politicians Expectation of Jayant Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.