नववर्षाची सुरुवात सोनसाखळीच्या चोरीने, साडेसहा तोळे सोने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 03:13 AM2018-01-03T03:13:56+5:302018-01-03T03:14:09+5:30
नववर्षाच्या स्वागताची सर्वत्र लगबग सुरु असताना वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिल्याच दिवसाची सायंकाळ सोनसाखळी चोरांनी गाजवली सायंकाळी सहाच्या सुमारास दोन वेगवेगळ्या घटनांत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ज्येष्ठ महिलांचे लक्ष विचलित करून तब्बल साडेसहा तोळ्यांचे दोन लाखांचे दागिने हिसकावले.
वाकड - नववर्षाच्या स्वागताची सर्वत्र लगबग सुरु असताना वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिल्याच दिवसाची सायंकाळ सोनसाखळी चोरांनी गाजवली सायंकाळी सहाच्या सुमारास दोन वेगवेगळ्या घटनांत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ज्येष्ठ महिलांचे लक्ष विचलित करून तब्बल साडेसहा तोळ्यांचे दोन लाखांचे दागिने हिसकावले. याप्रकरणी वाकड ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुनिता राजाराम चोगले (वय ६२, रा. गोल्डन पाम सोसायटी वाकड) व काशिबाई अरुण कलाटे (वय ५०, रा. शेडगेवस्ती वाकड) यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत उपनिरीक्षक संगीता घोडे यांनी दिलेली माहिती अशी सायंकाळी सुनिता चोगले ह्या आपल्या पाळीव कुत्र्याला फिरवून वाकड रस्त्यावरून परत घराकडे जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून अंगात जर्किंग व डोक्यात टोपी घातलेले दोघे आले त्यांनी चोगले यांच्या जवळ जात मागे बसलेल्या इसमाने बिल्डिंगकडे हात दाखवीत हात हलविला चोगले यांचे लक्ष विचलित झाले व त्यांनी बिल्डिंगकडे पाहताच त्यांच्या गळ्यातील साडे तीन तोळे वजनाची १ लाख ५ हजार रुपये किमतीची सोन्याची गोल माळ चोरट्यांनी हिसकावून पळ काढला तर दुसºया घटनेत अशाच प्रकारे प्रेस्टीन ग्रँडीवर सोसायटीसमोरील रस्त्यावर काशिबाई कलाटे या आपल्या पतीसह वोकिंग करीत असताना दुचाकीवरील दोघांनी त्यांच्याजवळ जात हातवारे करून त्यांचे लक्ष विचलित करून त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकाविले. अलीकडच्या काळात गेल्या दीड महिन्यात वाकड ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी हिसकाविण्याच्या सुमारे सात घटना घडल्या असून यात जेष्ठ महिलाच सहकार ठरत आहेत. पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
याबाबत पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतरही आरोपी सापडत नसल्याने परिसरातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.आरोपींना तातडीने अटक करावी.