‘तिच्या’ मदतीसाठी स्वयंसेवी संस्थेची धाव; पतीने झिडकारलेली महिला सावरतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:24 PM2018-02-13T15:24:24+5:302018-02-13T15:31:02+5:30

अगोदरच संकटात सापडलेली महिला आणखी संकटाच्या गर्तेत अडकू लागली असताना, पंजाबी वेल्फेअर असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमत कार्यालयास भेट देऊन महिलेची माहिती घेतली. तिला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.

NGO run for 'her' help; Punjabi welfare association initiative in Pimpri Chinchwad | ‘तिच्या’ मदतीसाठी स्वयंसेवी संस्थेची धाव; पतीने झिडकारलेली महिला सावरतेय

‘तिच्या’ मदतीसाठी स्वयंसेवी संस्थेची धाव; पतीने झिडकारलेली महिला सावरतेय

Next
ठळक मुद्देमुलींच्या जन्माने संकटात सापडलेली माता जुळ्यापैकी एक बाळ दगावल्याने आणखी विवंचनेतआर्थिक जुळवाजुळव करीत दुसऱ्या बाळाला जगविण्याचा तिचा प्रयत्न

पिंपरी : जुळ्या मुलींना जन्म दिल्याने पतीने झिडकारले. ९ महिने पूर्ण होण्याच्या अगोदरच प्रसूती झाल्याने दोन्ही बाळांची प्रकृती गंभीर होती. खचार्ची कशीबशी तोंडमिळवणी करीत असताना, सोमवारी दहाव्या दिवशी एक बाळ दगावले. दुसऱ्याला बाळाला वाचविण्याची तिची धडपड सुरू आहे. अगोदरच संकटात सापडलेली महिला आणखी संकटाच्या गर्तेत अडकू लागली असताना, पंजाबी वेल्फेअर असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमत कार्यालयास भेट देऊन महिलेची माहिती घेतली. तिला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.
विवाहानंतर पहिल्याच प्रसूतीसाठी पत्नीला माहेरी सोडले. प्रसूती झाली. तिने जुळ्या मुलींना जन्म दिला, मुली नकोशा आहेत, म्हणून ‘तू आणि तुझ्या मुली, माझा यापुढे तुझ्याशी काही संबंध राहणार नाही, असे सांगून विवाहाची वर्षपूर्ती होण्याआगोदरच पत्नीला एकाकी सोडून पती पंजाबमध्येच थांबला. पत्नीला आधार, धीर देण्याऐवजी जुळ्या मुलींना जन्म दिला याबद्दल दोषी ठरवून तिला एकाकी सोडणाऱ्या पाषाणहृदयी पतीने प्रसूतीनंतर पत्नीच्या तब्येतीची विचारपूस करण्याचीही तसदी घेतली नाही. 
मुलींच्या जन्माने संकटात सापडलेली माता जुळ्यापैकी एक बाळ दगावल्याने आणखी विवंचनेत पडली आहे. परिस्थितीला धैर्याने एकाकी झुंज देणाऱ्या या महिलेचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले. एकीकडे पतीची साथ नाही, दुसरीकडे आर्थिक जुळवाजुळव करीत दुसऱ्या बाळाला जगविण्याचा तिचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भातील लोकमतची बातमी वाचून पंजाबी वेल्फेअर असोशिएशनचे सेक्रेटरी हरेश मन्ना यांनी लोकमत पिंपरी कार्यालयात येऊन प्रतिनिधीची भेट घेतली. या महिलेसंबंधी तसेच तिच्या कुटुंबाविषयी माहिती घेऊन तिला मदत करण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे, असे सांगितले. संस्थेचे संस्थापक सुरेंद्र वाधवा व अन्य पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही या महिलेला तातडीने मदत करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना दिल्या. मुलींच्या जन्माने संकटात सापडलेली महिला धैर्याने परिस्थितीवर मात करीत असताना तिला येणाऱ्या अडचणींबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले. त्यामुळे संस्थेला माहिती मिळू शकली. त्यामुळे संस्थेचे सेक्रेटरी हरेश मन्ना यांनी लोकमतचे आभार मानले. 

Web Title: NGO run for 'her' help; Punjabi welfare association initiative in Pimpri Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.