‘ती’च्या मदतीला धावल्या स्वयंसेवी संस्था, पंजाबीज् वेलफेअर असोसिएशनचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 05:50 AM2018-02-14T05:50:08+5:302018-02-14T05:50:18+5:30

जुळ्या मुलींना जन्म दिल्याने पतीने झिडकारले. त्यातच ‘प्री-मॅच्युअर’ असल्याने दोन्ही बाळांची प्रकृती गंभीर होती. खर्चाची कशीबशी तोंडमिळवणी करीत असताना, सोमवारी दहाव्या दिवशी एक बाळ दगावले. दुस-या बाळाला वाचविण्याची तिची धडपड सुरू आहे.

NGO's, run by NGOs, initiative of Punjabis Welfare Association | ‘ती’च्या मदतीला धावल्या स्वयंसेवी संस्था, पंजाबीज् वेलफेअर असोसिएशनचा पुढाकार

‘ती’च्या मदतीला धावल्या स्वयंसेवी संस्था, पंजाबीज् वेलफेअर असोसिएशनचा पुढाकार

Next

पिंपरी : जुळ्या मुलींना जन्म दिल्याने पतीने झिडकारले. त्यातच ‘प्री-मॅच्युअर’ असल्याने दोन्ही बाळांची प्रकृती गंभीर होती. खर्चाची कशीबशी तोंडमिळवणी करीत असताना, सोमवारी दहाव्या दिवशी एक बाळ दगावले. दुस-या बाळाला वाचविण्याची तिची धडपड सुरू आहे. अगोदरच संकटात सापडलेली विवाहिता संकटाच्या गर्तेत अडकू लागली असताना, पंजाबीज् वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिका-यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट देऊन संबंधित महिलेची माहिती घेऊन तिला मदत करण्याची तयारी दाखविली आहे.
प्रेम विवाहानंतर पहिल्याच प्रसूतीसाठी पत्नीला माहेरी सोडले. प्रसूती झाली अन् तिने जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, मुली झाल्याचे कळल्यानंतर पतीने ‘तुझ्या मुली आणि तू, माझा यापुढे काही संबंध नाही,’ असे ठणकावून विवाहाची वर्षपूर्ती होण्याअगोदरच पत्नीला एकटे सोडून पती पंजाबमध्येच थांबला. जुळ्या मुली जन्मल्याबद्दल पत्नीला दोषी ठरवून तिला एकाकी सोडणाºया पाषाणहृदयी पतीने प्रसूतीनंतर पत्नीच्या तब्येतीची विचारपूस करण्याचीही तसदी घेतली नाही.
या संदर्भातील ‘लोकमत’ची बातमी वाचून पंजाबीज् वेलफेअर असोसिएशनचे सचिव हरेश मन्ना यांनी लोकमत पिंपरी कार्यालयात येऊन प्रतिनिधीची भेट घेतली. या महिलेसंबंधी माहिती घेऊन तिला मदत करण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे, असे सांगितले. संस्थेचे संस्थापक सुरेंद्र वाधवा व अन्य पदाधिकाºयांशी संपर्क साधला.

‘लोकमत’चे मानले आभार
मुलींच्या जन्माने संकटात सापडलेली महिला धैर्याने परिस्थितीवर मात करीत असताना तिला येणा-या अडचणींबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. त्यामुळे संस्थेला माहिती मिळू शकली. त्याबद्दल संस्थेचे सेक्रेटरी हरेश मन्ना यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.

Web Title: NGO's, run by NGOs, initiative of Punjabis Welfare Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.