पिंपरीत घरात आढळला '१८ किलो' वजनाचा नऊ फुटी अजगर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 09:08 PM2021-10-03T21:08:21+5:302021-10-04T19:21:33+5:30

सर्पमित्रांनी त्याला पकडून जंगलात सोडून जीवदान दिले.

A nine-foot python weighing '18 kg 'was found in a house in Pimpri | पिंपरीत घरात आढळला '१८ किलो' वजनाचा नऊ फुटी अजगर

पिंपरीत घरात आढळला '१८ किलो' वजनाचा नऊ फुटी अजगर

Next
ठळक मुद्देअजगर जातीचा इंडियन रॉक पायथन नावाचा हा बिनविषारी साप

पिंपरी : नेवाळे वस्ती, चिखली येथे रविवारी  रात्री अडीचच्या सुमारास पत्र्याच्या घरात नऊ फुटांचा १८ किलाे वजनाचा अजगर आढळला. सर्पमित्रांनी त्याला पकडून जंगलात सोडून जीवदान दिले. 

नेवाळे वस्ती येथील शेतकरी किरण नेवाळे यांच्या पत्र्याच्या घरात रविवारी रात्री अडीचच्या सुमारास साप दिसून आला. त्यानंतर सर्पमित्र वैभव कुरुंद यांना याबाबत माहिती देण्यात आली. घोणस जातीचा साप असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र कुरुंद यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता घरात भलामोठा अजगर असल्याचे दिसून आले. त्यामुळे कुरुंद यांनी मदतीसाठी सर्पमित्र विशाल पाचंदे, शुभम पांडे, योगेश कांजवणे, राजू कदम यांना बोलावले. त्यानंतर अजगराला पकडण्यात आले. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. तसेच मुळशी तालुक्यातील घाेटावडे परिसरातील वनपरिक्षेत्रात अजगराला सुरक्षितपणे सोडून जीवदान देण्यात आले. 

इंडियन रॉक पायथन नावाचा हा बिनविषारी साप

''अजगर जातीचा इंडियन रॉक पायथन नावाचा हा बिनविषारी साप आहे. नऊ फुटांचा १८ किलो वजनाचा नरजातीचा सात ते सहा वर्षांचा साप आहे. त्याला नियमित खाद्य मिळाल्यास २२ फुटांपर्यंत लांबी होऊन तो २५ वर्षे जगू शकतो. नागरी वस्तीमध्ये अजगर आढळत नाही. डोंगर-दऱ्या, पहाडी भागात तो आढळतो. त्याच्या मादीची ५० ते ६० अंडी घालण्याची क्षमता असते. तसेच हा अजगर निशाचर असल्याने रात्री तो त्याचे सावज शोधत असतो. शेड्यूल वन मधील प्राणी असून याबाबत वनविभागाला माहिती दिली असल्याचे वैभव कुरुंद यांनी सांगितले.''

Web Title: A nine-foot python weighing '18 kg 'was found in a house in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.