महापालिकेने ज्येष्ठांसाठी योजना राबविण्याची गरज

By admin | Published: June 10, 2017 02:06 AM2017-06-10T02:06:51+5:302017-06-10T02:06:51+5:30

पिंपरी -चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण अशा कल्याणकारी योजना सुरू कराव्यात, अशी ऐतिहासिक

NMC needs to implement schemes for the old people | महापालिकेने ज्येष्ठांसाठी योजना राबविण्याची गरज

महापालिकेने ज्येष्ठांसाठी योजना राबविण्याची गरज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
निगडी : पिंपरी -चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण अशा कल्याणकारी योजना सुरू कराव्यात, अशी ऐतिहासिक मागणी नगरसेवक उत्तम केंदळे व कमल घोलप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व सहायक आयुक्त तथा नागरवस्ती विकास योजनेचे वरिष्ठ अधिकारी डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्याकडे केली आहे.
या वेळी आयुक्त हर्डीकर व आष्टीकर यांनी यासाठी सहमती दर्शवत नागरवस्ती विकास योजनेच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आखण्याची भूमिका घेतली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना सुरू करण्याच्या मागणीचे त्यांनी स्वागत केले़ ही योजना सुरू झाल्यास ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळणार आहे. परंतु, योजना सुरू करण्यासाठी कायद्यातील आवश्यक बाबींचा आधार घेऊन ज्येष्ठ नागरिकांची निश्चित संख्या व योजनेसाठी लागणारा आवश्यक निधी आणि यासाठी उचित नियमावली याचाही विचार करावा लागणार आहे, अशी माहिती नागरवस्ती विभागाचे अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.
स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक केंदळे व नगरसेविका घोलप यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात.

Web Title: NMC needs to implement schemes for the old people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.