गृहनिर्माण सहकारी संस्थांकडून निवडणूक घेण्याचा नाही पत्ता

By admin | Published: June 30, 2017 03:50 AM2017-06-30T03:50:53+5:302017-06-30T03:50:53+5:30

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या नियमानुसार गृहनिर्माण सहकारी संस्थांची दर पाच वर्षांनी निवडणूक प्रक्रिया राबविणे बंधनकारक आहे.

No address for election from housing co-operative organizations | गृहनिर्माण सहकारी संस्थांकडून निवडणूक घेण्याचा नाही पत्ता

गृहनिर्माण सहकारी संस्थांकडून निवडणूक घेण्याचा नाही पत्ता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या नियमानुसार गृहनिर्माण सहकारी संस्थांची दर पाच वर्षांनी निवडणूक प्रक्रिया राबविणे बंधनकारक आहे. तरीही उद्योगनगरीतील प्रथितयश व जुन्या गृहनिर्माण संस्थांकडून निवडणुकीच्या नियमाला बगल दिली जात आहे. शहरात २०१३ पासून केवळ दहा टक्केच संस्थांच्या निवडणुका नियमानुसार झालेल्या आहेत. निवडणूक प्राधिकरणाच्या नियमानुसार न घेतलेल्या निवडणुका अवैध ठरणार असून, याकडे दुर्लक्ष करणा-या संस्थांवर उपनिबंधक कार्यालयांकडून कारवाई करण्यात येणार आहे.
सहकारी संस्था व गृहनिर्माण सोयायटींनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांतर्गत निवडणुका घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. उपनिबंधक कार्यालयामार्फत या निवडणुका घेतल्या जातात. निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करून रीतसर पद्धतीने ही प्रक्रिया पार पडते. मात्र, अनेक सहकारी गृहनिर्माण संस्था या प्रक्रियेस बगल देत आहेत.

Web Title: No address for election from housing co-operative organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.