पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात आता नाही भासणार रुग्णवाहिकांची कमतरता, एक कार्डियाकसह, नऊ रुग्णवाहिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 06:05 PM2021-05-03T18:05:34+5:302021-05-03T18:05:43+5:30

मागील वर्षी वायसीएम रुग्णालयाने रुग्णवाहिका खरेदीसाठी महापालिकेला प्रस्ताव

No ambulance shortage inside YCM hospital in Pimpri, nine ambulances admitted with one cardiac | पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात आता नाही भासणार रुग्णवाहिकांची कमतरता, एक कार्डियाकसह, नऊ रुग्णवाहिका दाखल

पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात आता नाही भासणार रुग्णवाहिकांची कमतरता, एक कार्डियाकसह, नऊ रुग्णवाहिका दाखल

Next
ठळक मुद्देकोरोनाच्या गंभीर रुग्णांना दाखल करण्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिकेची गरज

पिंपरी: शहरात कार्डियाक आणि इतर रुग्णवाहिकांची कमतरता होती. वायसीएम रुग्णालयाजवळ एकही कार्डियाक रुग्णवाहीका नव्हती. पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना स्थिती लक्षात घेता मागील वर्षी वायसीएम रुग्णालयाने रुग्णवाहिका खरेदीसाठी महापालिकेला प्रस्ताव दिला होता. त्यानुसार वायसीएम रुग्णालयालाला एक कार्डियाकसह नऊ रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. 

शहरात मागील वर्षी पासून कोरोनाचे संकट सुरू झाले. तेव्हा पासून रुग्णवाहिकांची कमतरता भासू लागली होती. अनेक रुग्णांना रुग्णवाहिका मिळणे कठीण झाले होते. त्यातच कोरोनाच्या गंभीर रुग्णांना दाखल करण्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिकेची गरज लागत होती. परंतु महापालिकेडे ही रुग्णवाहिका नव्हती त्यामुळे त्यामुळे रुग्ण दाखल करताना अडचणी येत होत्या.  वायसीएम रुग्णालय प्रशासनाने रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार महापालिकेने रुग्णवाहिका बनविण्याचे काम दिले होते. दोन दिवसांपूर्वी या रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. 

वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले,  मागील वर्षी रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव दिला होता. आता रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. एकूण नऊ रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. त्यात एक कार्डियाक आणि आठ नॉन कार्डियाक रुग्णवाहिका आहेत. नॉन कार्डियाकसाठी मनुष्यबळ उपलब्ध आहे. कार्डियाकसाठी डॉक्टर, नर्स, मदतनीस आवश्यक असतात. त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध केले जाईल. 

Web Title: No ambulance shortage inside YCM hospital in Pimpri, nine ambulances admitted with one cardiac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.