प्रचाराच्या खर्चाची नाही गणती, कार्यकर्त्यांच्या बसल्या पंगती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 12:49 AM2019-04-06T00:49:19+5:302019-04-06T00:49:43+5:30

उमेदवारांची मदार तरुण कार्यकर्त्यांवरच : सोशल मीडियावरील प्रचारावर भर

 No calculation of expenditure on campaigning, cadre of party workers | प्रचाराच्या खर्चाची नाही गणती, कार्यकर्त्यांच्या बसल्या पंगती

प्रचाराच्या खर्चाची नाही गणती, कार्यकर्त्यांच्या बसल्या पंगती

Next

युगंधर ताजणे 

पुणे : लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्षांबरोबरच युवा कार्यकर्त्यांच्या उत्साहाला अधिक उधाण आल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. निवडणुकांच्या काळात येणाऱ्या विषयांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्याने ते विद्यार्थी प्रत्यक्ष प्रचारात सहभागी होण्यास अधिक उत्सुक आहेत. दुसरीकडे उमेदवारांनी प्रचाराकरिता खर्च करण्यास सुरुवात केली असून, युवा कार्यकर्ते मेजवान्यांचा मनसोक्त आनंद घेत आहेत.

आपल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार करून त्याला निवडणुकीत जिंकून देण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करण्यात युवा कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असतो. मात्र गेल्या काही निवडणुकांपासून तरुण कार्यकर्त्यांची प्रचारात सहभागी करून घेण्यासाठीची ‘डिमांड’ वाढली आहे. जेवण, नाश्ता याबरोबरच पैसेही मिळावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जाऊ लागली आहे. प्रचारात तरुणांची संख्येला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करतो. आता प्रचाराकरिता युवा कार्यकर्त्यांच्या मोठ्या ‘टीम’ची नावे उमेदवारांकडे पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. प्रचारात किती तास सहभागी होणे यासाठी पैशांबरोबर ‘खानपानाची’ पद्धतशीर व्यवस्था व्हावी, अशी मागणी आहे. मोटार रॅलीद्ववारे शक्तिप्रदर्शन करायचे असल्यास गाडीत पेट्रोल टाकण्याची ‘डिमांड’ केली जात आहे. यामुळे उमेदवाराइतकेच त्याचा प्रचार करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांचा अधिक बोलबाला आहे. प्रचारात ६० टक्क्यांपेक्षा अधिक संख्या तरुणांची असून, त्यांना पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्ते मार्गदर्शन करतात. सध्या मतदारसंघातील सोसायट्या, विविध वस्त्यांमधील तरुण मतदार उमेदवाराच्या संपर्कात येण्यास सुरुवात झाली असून, जेवणावळीच्या पंगती उठू लागल्या आहेत. सोशल माध्यमांतून उमेदवाराचा प्रचार करण्यास युवा कार्यकर्त्यांची मदत घेतली जात आहे. दौरा, जाहीर भाषणे यांचे चित्रीकरण करत ते फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपद्ववारे मतदारांपर्यंत पोहोचविले जात आहेत. प्रचारात सहभागी कार्यकर्त्यांना पोस्ट शेयर करणे बंधनकारक असून, त्यांच्या वेगवेगळ्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून देखील भाऊ, दादा, काका, अण्णा यांचा प्रचार सुरूझाला आहे.

असा होतो नाद खुळा प्रचार
खासदाराच्या निवडणुकांकरिता असलेल्या सहा तालुक्यांची मिळून मतदारसंघाची रचना तयार करण्यात आली आहे. मतदारसंघाचे कार्यक्षेत्र, लोकसंख्या लक्षात घेता प्रत्येक तालुक्यातील पक्षप्रमुखांकडे तरुणांच्या प्रचार नियोजनाची जबाबदारी दिली जाते. याचबरोबर जिल्हा परिषदेतील गट अंतर्गत असणाºया पंचायत समितीतील सदस्यांची याकामी मदत घेतली जाते. जिल्हा परिषदेचा, पंचायत समितीवर असणारा पदाधिकारी तरुण कार्यकर्त्यांना प्रचार मार्गदर्शनाचे काम करतो. प्रचाराकरिता आलेले युवा कार्यकर्ते कुठून आले आहेत, त्या भागातील राजकीय, सामाजिक माहिती गोळा करून संबंधित आपल्या उमेदवाराला होणाºया मतदानाची संख्या वाढविण्यावर भर दिला जातो. इतर युवा कार्यकर्त्यांना एकत्र क रण्यास सांगितले जाऊन त्यांच्याकरिता खानपानाची व्यवस्था केल्याचे सांगितले जाते.

फॉरेन ट्रिपची आश्वासने
जेवढी तरुणाईच्या ग्रुपची संख्या अधिक तितकी त्यांची ’काळजी’ अधिक घेतली जाते. शहराबरोबरच ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळातील युवा कार्यकर्त्यांना हाताशी धरून त्यांना प्रचारकामात सहभागी केले जाते. अनेकांना ‘फॉरेन ट्रिप’ची आश्वासने दिली जातात. तर साधारण पाचशे ते हजार रुपयांची हजेरी देऊन प्रचाराकरिता बोलविण्यात येते. पैसे आणि खाण्यापिण्याची व्यवस्थेशिवाय तरुण कार्यकर्ते प्रचारात सहजासहजी सहभागी होत नसल्याचे दिसून येते.
- एक कार्यकर्ता

Web Title:  No calculation of expenditure on campaigning, cadre of party workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे