स्थापत्य अन् शिक्षण विभागात नाही समन्वय; विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 02:02 PM2019-12-10T14:02:12+5:302019-12-10T14:29:59+5:30

धोकादायक इमारत : शाळेसाठी पर्यायी सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

No coordination in the architecture and education departments students life in danger zone | स्थापत्य अन् शिक्षण विभागात नाही समन्वय; विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ 

स्थापत्य अन् शिक्षण विभागात नाही समन्वय; विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ 

Next
ठळक मुद्देस्ट्रक्चरल ऑडिटनुसार शाळेची इमारत धोकादायक शिक्षण विभागाने केले हातवर 

शीतल मुंडे - 
पिंपरी : भोसरी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेची श्री छत्रपती शिवाजीमहाराज माध्यमिक विद्यालयाची इमारत धोकादायक असल्याचे स्ट्रक्चरल ऑडिटमधून समोर आले आहे. इमारतीच्या आजूबाजूला फिरणे देखील धोकादायक आहे. असा फलक महापालिका प्रशासनाकडून लावण्यात आला आहे. तरी देखील धोकादायक इमारतीमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, प्रयोगशाळा, ग्रंथालय, कामकाज कार्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जीव मुठीत धरून ये-जा करतात.
‘शाळेच्या धोकादायक इमारतीच्या आवारात विद्याथ्यांचा वावर’ असे वृत्त लोकमतने ३० नोव्हेंबर २०१९ ला दिले होते.  त्यानंतरही महापालिका प्रशासनाने फक्त कागदी घोडेच नाचवले. स्थापत्य विभाग आणि शिक्षण विभाग फक्त ऐकमेकांकडे बोट दाखवत आहे. मात्र धोकादायक इमारतीच्या बाजुच्या पत्र्याच्या शेडमधील शाळेसाठी पर्यायी सुविधा निर्माण करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. 
शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले की, जुनी इमारत धोकादायक असल्यामुळे आम्ही पर्यायी व्यवस्था केली आहे. वर्ग खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात कार्यालयीन कामकाज, स्वच्छतागृह, ग्रंथालय आदी आवश्यक सुविधा जुन्याच धोकादायक इमारतीमध्ये आहेत. पर्यायी व्यवस्था नसल्याने विद्यार्थी व  शिक्षकांना भीती असतानाही ये जा करावी लागत आहे.
 

शिक्षण विभागाने केले हातवर 
शाळेची धोकादायक इमारत पाडण्याचे काम स्थापत्य विभागाचे आहे. आम्ही वेळोवेळी स्थापत्य विभागाला पत्र व्यवहार केला आहे. स्मरण पत्रे पाठवली आहेत. इमारतीचे काय करायचे, इमारत कशी रिकामी करायची हा प्रश्न स्थापत्य विभागाचा आहे, असे म्हणून शिक्षण विभागातील अधिकारी हातवर करत आहेत. 
 

वॉर्डातील समस्यांबाबत ओरडणारे नगरसेवक गप्प का?
स्ट्रक्चरल डिटमध्ये शाळा इमारत धोकादायक म्हणून घोषित केल्यानंतही शाळा सिल बंद करण्यात आली नाही. विद्यार्थी धोकादायक इमारतीमध्ये ये-जा करतात. हे नगरसेवकांना देखील माहिती आहे. वॉर्डातील इतर समस्येंबाबत नगरसेवक कायम ओरडत असतात. मात्र याठिकाणी विद्यार्थ्यांच्या जिवाचा प्रश्न असताना स्थानिक नगरसेवक मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत.
....
धोकादायक इमारत लवकर पाडण्यात यावी. या बाबतचे पत्र आम्ही स्थापत्य विभागाला या अगोदर देखील दिली आहेत. लोकमतने प्रसिध्द केल्या बातमीनंतरही स्मरण पत्र होते. शेवटी इमारत पाडण्याचे काम स्थापत्य विभागाचे आहे. - पराग मुंडे, प्रशासन अधिकारी माध्यमिक  शिक्षण विभाग
..................
स्ट्रक्चरल ऑडिटनुसार शाळेची इमारत धोकादायक आहे. शाळेच्या इमारतीसमोर तसा फ लकही स्थापत्य विभागाकडून लावण्यात आला आहे. इमारतीमध्ये किंवा इमारतीच्या परिसरामध्ये वावरने देखील धोकादायक आहे. प्रभाग कार्यालयाच्या मिंटिगमध्ये इमारत पाडण्याची परवानगी घेऊन इमारत पाडण्यात येणार आहे. - संजय घुबे, कार्यकारी अभियंता स्थापत्य विभाग 
..............
पूर्ण पर्यायी व्यवस्था करून देणे आवश्यक आहे. वर्ग संख्या देखील अपुरी आहे. कार्यालयीन साहित्य ठेवणार कुठे?- जनार्दन सांळुखे, मुख्याध्यापक 

Web Title: No coordination in the architecture and education departments students life in danger zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.