कोरोनाचा टाळण्यासाठी गावांमध्ये पाहुण्यांना नो एंट्री ; दगड व झाडांच्या फांद्या टाकून रस्ते बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 10:50 AM2020-03-25T10:50:14+5:302020-03-25T10:52:35+5:30

पुणे, मुंबईतील किंवा इतर गावातील नागरिकांनी आपल्या गावात येऊ नये व गावातील नागरिकांनी बाहेर जाऊ नये. यासाठी रस्ते बंद करून गावामध्ये येण्यास नो एंट्री केली आहे. 

No entry for guests in the villages to prevent Corona; Roads closed with stones and tree trunks | कोरोनाचा टाळण्यासाठी गावांमध्ये पाहुण्यांना नो एंट्री ; दगड व झाडांच्या फांद्या टाकून रस्ते बंद 

कोरोनाचा टाळण्यासाठी गावांमध्ये पाहुण्यांना नो एंट्री ; दगड व झाडांच्या फांद्या टाकून रस्ते बंद 

googlenewsNext

पिंपरी चिंचवड :  कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मावळ तालुक्यातील अनेक गावात रस्त्यावर दगड व झाडांच्या फांद्या टाकून रस्ते बंद केले आहेत. पुणे, मुंबईतील किंवा इतर गावातील नागरिकांनी आपल्या गावात येऊ नये व गावातील नागरिकांनी बाहेर जाऊ नये. यासाठी रस्ते बंद करून गावामध्ये येण्यास नो एंट्री केली आहे. 
साळुंब्रे गावातील ग्रामस्थांनी वेशीवरच रस्ता बंद केला आहे गावात नवीन  येणा-या व्यक्तींची माहिती आशा अंगणवाडी सेविका यांना देण्यात यावी. जीवनावश्यक वस्तू घरपोच आणून दिल्याजातील त्यामुळे कोणीही गाव सोडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. 


तसेच देवले, पाटण साते ग्रामपंचायतीच्या हद्दीत साते, मोहीतेवाडी,विनोदेवाडी, ब्राह्मणवाडी, या गावातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.तर पवन मावळातील तीस गावांना जाणारा मुख्य रस्ता पोलिसांनी बंद केला आहे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने गावातील रस्ते सुरक्षेतेसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: No entry for guests in the villages to prevent Corona; Roads closed with stones and tree trunks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.