"सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही येत नसतो, जेंव्हा ती मिळते..."; राज ठाकरेंचा राज्यकर्त्यांना टोला

By विश्वास मोरे | Published: August 19, 2023 05:30 PM2023-08-19T17:30:25+5:302023-08-19T17:32:43+5:30

पत्रकारांवर जर हल्ले झाले तर राज ठाकरे तुमच्यासोबत कायम असेल, असे आश्वासन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी प्राधिकरण येथे शनिवारी व्यक्त केले...

"No one comes with the girdle of power, when it comes..."; Raj Thackeray's advice to the rulers | "सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही येत नसतो, जेंव्हा ती मिळते..."; राज ठाकरेंचा राज्यकर्त्यांना टोला

"सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही येत नसतो, जेंव्हा ती मिळते..."; राज ठाकरेंचा राज्यकर्त्यांना टोला

googlenewsNext

पिंपरी : जर एखादा हल्ला आमच्यावर झाला, तर त्याचा राग आम्हालाही येतो. त्यामुळे हल्ले कुणावरही होऊ नयेत. दुसरीकडे अजित पवार सत्तेमध्ये गेले, त्याचा तुम्हाला राग आला पाहिजे. ज्या व्यक्तीवर पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, तोच व्यक्ती सत्तेत जातो. तो व्यक्ती सडेतोड खोटे बोलतो, त्याला जर लोक हसत असतील, त्यांची प्रचंड चीड येते. पत्रकारांवर जर हल्ले झाले तर राज ठाकरे तुमच्यासोबत कायम असेल, असे आश्वासन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी प्राधिकरण येथे शनिवारी व्यक्त केले.

निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पिंपरी चिंचवड एडिटर्स गिल्डच्या वतीने पत्रकार हल्ला विरोधी व कायदा परिषद व पत्रकार हक्कासाठी लढणाºया राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव समारंभ झाला. त्यात ठाकरे बोलत होते. अध्यक्षस्थानी अविनाश चिलेकर होते. यावेळी लोकमतचे संपादक संजय आवटे, सकाळचे संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार, पुढारीचे संपादक सुनील माळी, सीविक मिररचे संपादक अविनाश थोरात उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांच्या हस्ते कमलेश सुतार, गोविंद वाकडे, अमित मोडक, संदीप महाजन, अश्विनी सातव-डोके, नितीन पाटील, आशिष देशमुख, महेश तिवारी यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

तुमचे लेखन, तुम्ही कोणाला आवडता ते पाहत बसू नका

पक्षप्रमुख राज ठाकरे म्हणाले, ‘‘तुम्ही लिहिता, व्यक्त होता त्यानंतर तुम्हाला ट्रोल केले जाते. पण, ते तुम्ही वाचता कशाला? माझं भाषण, मुलाखत एकदा झाली की झाली. शब्द गेले की कोणाला काही वाटेल ते वाटेल.पत्रकारांवर हल्ले होत आहेत, हे अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह आहे. तुमचे लेखन, तुम्ही कोणाला आवडता ते पाहत बसू नका. मोबईल नावाचं खेळणे हातात, आल्याने अनेक निरुद्योगी व्यक्त व्हायला लागले आहेत. त्यांना घरात बसून करायचं काय असा प्रश्न पडतो. मग असे ट्रोल केले जाते. त्यांना इतिहास, बातमीचा विषय, पत्रकारिती काही माहिती नसते. ते फक्त व्यक्त होतात. राजकीय पक्षांनी पाळलेले लोकही आहेतच. त्या पाळलेल्या लोकांवर कशाला प्रतिक्रिया देता. दर महिन्याला ते लिहायचे पैसे मिळतात. त्यांचा कशाला विचार करता. जे महाराष्ट्र हिताचे असेल ते निर्भिडपणे लिहिणे, बोलणे महत्वाचे आहे.’’

तुम्ही काहीही विचारणार असाल, तर मी राज ठाकरे आहे-

वृत्तवाहिन्यांच्या स्पर्धेविषयी टीका करताना ठाकरे म्हणाले, ‘‘माजी पंतप्रधान अटल बिहारीवाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी व्हायची. पण, मते मिळत नव्हते. मात्र, हळूहळू काळ बदलून गर्दी मतांमध्ये येत आहे. कोणतेही चढउतार न पाहता, पत्रकार म्हणून काहीही विचारतात. तुम्ही असेच काहीही विचारणार असाल तर मी राज ठाकरे आहे.’’ असेही सुनावले. भाजपाचे नाव न घेता ठाकरे म्हणाले, ‘‘सत्ताधारी पराभूत होत असतात, पण विरोधक विजय होत नसतात.’’ ‘‘

राजकारणाची भाषा घसरली-

ठाकरे म्हणाले, ‘‘ग्रामीण महाराष्ट्रात पत्रकार परिषदा घेऊच नये, असे वाटते. कारण, त्यांच्याकडे प्रश्नच नसतात. सध्या याला काय वाटतं. त्याला काय वाटत, तेच चालू आहे. वृत्तवाहिन्यांवर तेच सुरू आहे. उत्तम काम करणारे अनेक पत्रकार आहेत. मात्र, राजकारणाची भाषा घसरली आहे. राजकारणातील अनेक नेते वाह्यातपणे बोलत आहेत. कारण, तुम्ही त्यांना दाखवतात. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नसतो. सत्ता ज्या दिवशी हातात येते, त्याच दिवशी ती जायला लागते. ती टिकवायची किती, तेवढचं तुमच्या हातात असतं. विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो. सत्ताधारी पक्ष हारत असतो.’’

Web Title: "No one comes with the girdle of power, when it comes..."; Raj Thackeray's advice to the rulers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.