१५०० रुपये नको, आम्हाला सुरक्षितता द्या; गृहमंत्री राजीनामा द्या, पिंपरीत शिवसेनेचे आंदोलन

By विश्वास मोरे | Published: August 21, 2024 05:01 PM2024-08-21T17:01:53+5:302024-08-21T17:02:14+5:30

गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे पक्ष फोडण्याची, सत्तेची खुर्ची वाचविण्याची जबाबदारी

No Rs 1500 give us security Home Minister should resign Shiv Sena protest in Pimprit | १५०० रुपये नको, आम्हाला सुरक्षितता द्या; गृहमंत्री राजीनामा द्या, पिंपरीत शिवसेनेचे आंदोलन

१५०० रुपये नको, आम्हाला सुरक्षितता द्या; गृहमंत्री राजीनामा द्या, पिंपरीत शिवसेनेचे आंदोलन

पिंपरी: बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव ठाकरे ) शहर महिला आघाडी व शहर शिवसेनेच्या वतीने बुधवारी आकुर्डीत घटनेचा निषेध नोंदवत आंदोलन केले. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामाची मागणी केली. महिलांनी काळ्याफिती लावून निषेध व्यक्त केला. 

आकुर्डीतील आंदोलनाला जिल्हा संघटिका शैला खंडागळे, उपसंघटक वैशाली मराठी, शहर संघटिका अनिता तुतारे, उपशहर प्रमुख कामिनी मिश्रा, पिंपरी विधानसभा प्रमुख वैशाली कुलथे, माजी शहर संघटक सुशीला पवार, शहर संघटक संतोष सौन्दणकर, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, मीनल यादव, रवी लांडगे, उपजिल्हा संघटक दस्तगीर मणियार, उपशहर प्रमुख रजनी वाघ, योगिनी मोहन आदी उपस्थित होते.
 
सुलभा उबाळे म्हणाल्या, 'सत्तेत असलेल्या भाजपला  जनतेच्या सुरक्षेबाबत काही देणे घेणे नाही. गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे पक्ष फोडण्याची, सत्तेची खुर्ची वाचविण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सुरू असलेल्या मनमानीवर गृहमंत्र्यांचा वचक नाही. पर्यायाने पोलीस यंत्रणा अक्षरश: कोलमडलेल्या स्थितीत आहे.  चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर पीडित पालकांची तक्रार नोंदवून घेतली जात नाही. ११ तासाहून अधिक वेळ पालकांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवले जाते.  अशा प्रकारची दिरंगाई याआधी महाराष्ट्रात कधीही पाहायला मिळालेली नाही. . रस्त्यावर माणसे  चिरडली जातात मात्र पोलीस यंत्रणा आरोपीला वाचवण्यात आपला वेळ खर्ची करते.  यावर गृहमंत्री तात्काळ कारवाई करत नाहीत. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था अक्षरशः पायदळी तुडवली जात आहे.' 

फास्टट्रॅक सुनावणी घ्या 

शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्हाला देण्यात येणार असलेले १५०० रुपये नको. मात्र, आम्हाला सुरक्षितता द्या. आरोपीवर तात्काळ कारवाई करा. फास्टट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपी विरोधात खटला चालवून चिमुरड्या मुलींना न्याय मिळवून द्या, अशी मागणी केली. 

Web Title: No Rs 1500 give us security Home Minister should resign Shiv Sena protest in Pimprit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.