एकही निवाराशेड नाही धड

By admin | Published: December 11, 2015 12:43 AM2015-12-11T00:43:27+5:302015-12-11T00:43:27+5:30

रहाटणी, पिंपळे सौदागर परिसराचा विकास झपाट्याने झाला असे सांगितले जाते. भागाच्या काही प्रमाणात अधिक नागरी सुविधा या परिसरात पालिका प्रशासनाकडून पुरविण्यात आल्या

No Tearaway Shade | एकही निवाराशेड नाही धड

एकही निवाराशेड नाही धड

Next

रहाटणी : रहाटणी, पिंपळे सौदागर परिसराचा विकास झपाट्याने झाला असे सांगितले जाते. भागाच्या काही प्रमाणात अधिक नागरी सुविधा या परिसरात पालिका प्रशासनाकडून पुरविण्यात आल्या. मात्र शहरातील इतर भागापेक्षा रहाटणी हा भाग म्हणावा तसा विकसित झालाच नाही. मागील काही वर्षांपासून रहाटणी चौकातील साधा बसथांबा दुरुस्त करण्यात आला नाही. या ठिकाणी तीन बसथांबा प्रवासी निवारा शेड आहेत. मात्र एकही निवारा शेड चांगली नसल्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूंत प्रवाशांना उघड्यावरच थांबावे लागत आहे. यामुळे परिसरातील प्रवासी व नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
रहाटणी चौकात मुख्य बसथांबा आहे. शहरातील सर्वच भागांत जाण्यासाठी येथून पीएमपी बस सुटतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी येथे थांबलेले असतात. मागील अनेक वर्षांपूर्वी येथे निवारा शेड उभारण्यात आले. त्यानंतर देखभालीकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले. या तीनही शेड पूर्णत: मोडकळीस आल्या आहेत. वादळी वाऱ्यात शेड पडून अपघात होऊ शकतो. तसेच या शेडमध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना बसची प्रतीक्षा रस्त्यावर ताटकळत उभे राहूनच करावी लागत आहे. हा मुख्य रस्ता व चौक असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून रस्त्यावर उभे राहावे लागत आहे . तसेच या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे . तरी महापालिका प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. शहरासह आजूबाजूच्या परिसरात नको त्या ठिकाणी सुद्धा नवीन आधुनिक पद्धतीचे प्रवासी निवारा शेड उभारण्यात आले आहे. पण, या ठिकाणचे शेड तुटलेल्या अवस्थेत मागील काही वर्षांपासून आहेत. याकडे पालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे लक्ष जात नाही की, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, अशी शंका येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.(वार्ताहर)
> 1शहरातील काही ठिकाणच्या बीआरटी मार्गावरील बस सुरू झाल्या. या मार्गावर एकाच ठिकाणी दोन सुसज्ज बसथांबा प्रवासी निवारा शेड उभारण्यात आल्या आहेत. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. काही ठिकाणी हाकेच्या अंतरावर बसथांबा शेड उभारण्यात आल्या आहेत. अशा काही बसथांब्यांवर प्रवासी शोधूनही दिसत नाहीत. मात्र, रोज हजारो प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या येथील निवारा शेडची एवढी दयनीय अवस्था व्हावी ही स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे नागरिक म्हणत आहेत.
2पिंपरी-चिंचवड शहराचा व उपनगरांचा काही वर्षांत झपाट्याने विकास झाला. रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज या नागरी सुविधा मिळाल्या. मात्र रहाटणी भाग तसा मागासलेलाच राहिला. रस्ते विकसित नाहीत , फुटपाथ
नाहीत. नियोजित डीपी रस्ते अद्यापही विकसित नाहीत. भाजी मंडई नाही. खेळाचे मैदान नाही. अनेक रस्त्यांचे डांबरीकरण नाही. कायम पाण्याचा प्रश्न सतावतो. परिसरात ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग असतात. त्यामुळे रहाटणीगाव व परिसर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आहे की नाही हा प्रश्न नागरिकांना पडतो. एखाद्या खेडेगावची परिस्थिती बरी म्हणण्याची वेळ सध्या रहाटणीकरांवर आली आहे.

Web Title: No Tearaway Shade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.