जनशक्तीला कोणीही हरवू शकत नाही

By admin | Published: July 5, 2017 02:59 AM2017-07-05T02:59:44+5:302017-07-05T02:59:44+5:30

आजपर्यंतच्या राजकारण्यांनी निवडणुका आल्या की अनधिकृत घरे अधिकृत करू, कोणाच्याही घराची वीट पडू देणार नाही, अशा

Nobody can defeat people's power | जनशक्तीला कोणीही हरवू शकत नाही

जनशक्तीला कोणीही हरवू शकत नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रावेत : आजपर्यंतच्या राजकारण्यांनी निवडणुका आल्या की अनधिकृत घरे अधिकृत करू, कोणाच्याही घराची वीट पडू देणार नाही, अशा प्रकारची केवळ आश्वासने दिले आहेत हेच राजकीय नेते आज चुकीच्या मार्गाने मार्गदर्शन करीत आहेत़ त्यांच्या भूल थापांना बळी न पडता आपण सर्वांनी एकत्रित राहून हा लढा तीव्र केला पाहिजे. आजपर्यंतचा इतिहास पाहता जनशक्तीला कोणीही हरवू शकत नाही, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी रिंगरोड बाधित नागरिकांच्या घर बचाव संघर्ष समितीने काळेवाडी फाटा येथील बीआरटी मार्गावर आयोजित सभेत केले.
ते पुढे म्हणाले की, झोडा
आणि फोडा ही नीती हाणून पाडायची असेल तर संघटन
मजबूत ठेवून या भुलभुलैय्याला उत्तर केवळ संघर्षातून देता येईल. या वेळी त्यांनी सर्वच राजकीय पक्षांवर सडकून टीका केली.
महापालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंद एचसीएमटीआरचा ६५टक्के जागेचा ताबा असून उर्वरित जागा ताब्यात घेण्याबाबत पालिका व प्राधिकरणामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. वाल्हेकरवाडी ते पिंपळे गुरवपर्यंतच्या प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईला घरे वाचवा संघर्ष समितीने तीव्र विरोध केला आहे. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, शस्ती कर आणि प्रस्तावित रिंगरोडमधून बाधित होणाऱ्या घरांना संरक्षण मिळावे यासाठी हा लढा कायमचा प्रश्न सुटेपर्यंत असाच चालू राहणार आहे, असा निर्धार या वेळी करण्यात आला.
वाल्हेकरवाडीसह थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, पिंपळे गुरव आदी भागांतून प्रस्तावित असणाऱ्या रिंगरोडला विरोध करण्यासाठी तसेच रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे पाडण्यास विरोध असणारांची संयुक्त सभा काळेवाडी फाटा येथे आयोजित करण्यात आली होती.
या वेळी हजारो महिला उपस्थित होत्या. या बैठकीत प्रशासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरोध ठाम विरोध केला आहे. प्राधिकरण आणि पिंपरी पालिकेच्या चुकीचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास कशासाठी? असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे. ‘महिला शक्ती उतरी है, नयी रोशनी लायी है,’ हम सब एक है, फुल नाही चिंगारी है, घर आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, सर उठाके हल्लाबोल, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. या वेळी मानव कांबळे, मारुती भापकर, हिरामण बारणे, कॉम्रेड विलास सोनवणे, राहुल कलाटे, अमित गावडे, सचिन चिंचवडे, विजय पाटील, धनंजय येळेकर, ज्योती टिळेकर, रेखा भोळे, नंदा काकडे आदींसह परिसरातील हजारो महिला आणि नागरिक उपस्थित होते.

अनधिकृत घरे अधिकृत होण्यासाठी निवडणुकीपूर्वी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता़ तेच आमदार आणि खासदार अनधिकृत बांधकामाचा विषय समोर घेऊन पुन्हा आपल्या मतावर निवडून आले. ते आज गप्प का? त्यांना या प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील. रिंगरोडबाबत हे आता वेगळी भूमिका का घेत आहेत? आता आमदार म्हणतात, रिंगरोड बाधित कुटुंबाना पंतप्रधान आवास योजनेतून पाच ते सहा लाखांत घरे उपलब्ध करून दिले जातील. या वक्तव्याचा आम्ही निषेध करीत आहोत. आम्हाला योजनेची घरे नको आहेत तर आमची हक्काची घरे वाचली पाहिजे. जर इतर आरक्षणे बदलता येतात तर हे आरक्षणसुद्धा शासनास बदलण्यास आपण भाग पाडू़- मानव कांबळे

Web Title: Nobody can defeat people's power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.