गुन्हे नसलेले उमेदवार; तरीही ठिकठिकाणी राडा

By admin | Published: February 23, 2017 02:57 AM2017-02-23T02:57:59+5:302017-02-23T02:57:59+5:30

संवेदनशील म्हणून घोषित केलेल्या प्रभागांमध्येही मतदान केंद्राबाहेर उमेदवारांसंबंधी माहितीचे

Non-criminal candidates; Still stare at all | गुन्हे नसलेले उमेदवार; तरीही ठिकठिकाणी राडा

गुन्हे नसलेले उमेदवार; तरीही ठिकठिकाणी राडा

Next

पिंपरी : संवेदनशील म्हणून घोषित केलेल्या प्रभागांमध्येही मतदान केंद्राबाहेर उमेदवारांसंबंधी माहितीचे फलक लावले होते. त्या फलकावर निवडणूक रिंगणातील उमेवारांवर गुन्हे नाहीत, असा उल्लेख दिसून आला. उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी निरंक दाखवली असताना, महापालिका निवडणुकीत मतदानाच्या दिवसापर्यंत ठिकठिकाणी राडेबाजी कशी झाली, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
महापालिका निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवाराची संपत्ती, तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी याबाबतची उमेदवाराने प्रतिज्ञापत्रावर सादर केलेली माहिती जनतेला व्हावी, यासाठी या वेळी पहिल्यांदाच
मतदान केंद्राबाहेर मोठे फलक
लावले होते. प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी नजरेस पडेल अशा पद्धतीने हे फलक लावले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Non-criminal candidates; Still stare at all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.