राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने हाल

By Admin | Published: January 24, 2017 02:06 AM2017-01-24T02:06:07+5:302017-01-24T02:06:07+5:30

मोठा विस्तार असलेल्या काळेवाडी व परिसरात जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार लोकसंख्या असतानाही या भागात राष्ट्रीयीकृत

Not being a nationalized bank, | राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने हाल

राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने हाल

googlenewsNext

काळेवाडी : मोठा विस्तार असलेल्या काळेवाडी व परिसरात जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार लोकसंख्या असतानाही या भागात
राष्ट्रीयीकृत (नॅशनल) बँकेची कोणतीही शाखा नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणीचा सामोरे जावे लागत आहे.
यामुळे या परिसरात राहणाऱ्या लोकांना विविध शासकीय कामासाठी भराव्या लागणाऱ्या शुल्काचा डिमांड ड्राफ्ट व चलन, तसेच सेवानिवृत्त नागरिकांची पेन्शन व तत्सम बँकेतील इतर कामे करण्यासाठी पिंपरी किंवा चिंचवडमधील बँकेत जाऊन ही कामे करावी लागतात. त्यामुळे तेथेही अनेक नागरिकांची गर्दी असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक व इतरांना काम सोडून बराच वेळ ताटकळत रांगेत उभे राहावे
लागते, यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे. येथे राष्ट्रीयकृत बंँक नसल्यामुळे नागरिकांचे हाल
होत आहेत.(वार्ताहर)

Web Title: Not being a nationalized bank,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.