हा कचरा नव्हे....स्वस्त धान्य दुकानाबाहेर पिशव्यांच्या रांगा; नागरिकांकडून सोशल डिस्टन्सची पायमल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 05:10 PM2020-04-15T17:10:37+5:302020-04-15T17:17:41+5:30

उन्हाच्या झळा वाढत गेल्यावर नागरिक रांगेत पिशव्या ठेऊन आपला नंबर येईल याची प्रतीक्षा करत एकत्रित बसत आहेत.

This is not a waste .... bags of outside at a few rate grain shop | हा कचरा नव्हे....स्वस्त धान्य दुकानाबाहेर पिशव्यांच्या रांगा; नागरिकांकडून सोशल डिस्टन्सची पायमल्ली

हा कचरा नव्हे....स्वस्त धान्य दुकानाबाहेर पिशव्यांच्या रांगा; नागरिकांकडून सोशल डिस्टन्सची पायमल्ली

Next
ठळक मुद्देदुकान बंद झाल्यावर पुन्हा उघडेपर्यंत नागरिक रस्त्यावर बसून रहात असल्याने परिसर संतप्त

चिंचवड : सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी वारंवार सूचना दिल्या जात आहेत. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणाने नागरिक घराबाहेर पडून गर्दी करत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.चिंचवडमधील दळवीनगरमध्ये स्वस्त धान्याच्या दुकानाबाहेर नागरिकांची गर्दी उसळली आहे.भांडणाच्या घटना घडत नागरिकांनी रांगेत पिशव्या ठेऊन नंबर लावले आहेत.
लॉकडाऊनमुळे अनेकांचे संसार हतबल झाले आहेत.घराची चूल पेटविण्यासाठी काहींचा धावा सुरू आहे.मात्र घरातील धान्य संपल्याने अनेकजण अडचणीत आहेत.शासनाकडून देण्यात येणारे अन्न-धान्य वितरित करणारी यंत्रणा सज्ज झाली आहे.मात्र अशा दुकानाबाहेर नागरिकांची गर्दी वाढत आहे.संचारबंदी चे उल्लंणघन करीत,तोंडावर मास्क न लावता अनेक जण घराबाहेर पडत आहेत.दळवीनगरातील स्वस्त धान्य दुकाना बाहेर गर्दी वाढत असून नागरिकांमध्ये भांडणे होण्याचे प्रकार वाढले आहेत.

दुकान उघडण्याआधी नागरिक रांगेत थांबत आहेत.उन्हाच्या झळा वाढत गेल्यावर नागरिक रांगेत पिशव्या ठेऊन आपला नंबर येईल याची प्रतीक्षा करीत एकत्रित बसत आहेत.कोणतीही सुरक्षितता न पाळता नागरिक गर्दी करीत आहेत.पोलीस प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानाच्या ठिकाणी जाऊन गर्दीवर नियंत्रण मिळविणे महत्वाचे आहे.धान्य संपेल या भीतीपोटी नागरींमध्ये संभ्रम असल्याने या भागात दिवसभर गर्दी असते.दुकान बंद झाल्यावर पुन्हा दुकान उघडेपर्यंत नागरिक रस्त्यावर बसून रहात असल्याने परिसरातील नागरिक संतप्त व्यक्त करीत आहेत.या ठिकाणी त्वरित कारवाई करावी अशी परिसरातील रहिवाशांची मागणी आहे.

Web Title: This is not a waste .... bags of outside at a few rate grain shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.