प्राधिकरणाकडून व्यापाऱ्यांना नोटीस
By admin | Published: June 30, 2017 03:40 AM2017-06-30T03:40:44+5:302017-06-30T03:40:44+5:30
प्राधिकरण आणि महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंद रिंगरोडसाठी वाल्हेकरवाडी येथील गुरुद्वारातील
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेत : प्राधिकरण आणि महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंद रिंगरोडसाठी वाल्हेकरवाडी येथील गुरुद्वारातील सर्व्हे नं. १३४ मधील बाधित दुकानांना गुरुवारी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३(१)अन्वये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण झोन तीनचे क्षेत्रिय अधिकारी ए. व्ही. दुधलवार यांच्या स्वाक्षरीने नोटीस बजावल्या आहेत.
सदर परिसराची प्राधिकरण प्रशासनाने १६ जून रोजी पाहणी करून कार्यालयास अहवाल सादर केला होता. वाल्हेकरवाडी येथील पेठ क्रमांक ३०, ३१, आणि ३३ मधील गुरुद्वारा चौक, बळवंतनगर, बिजलीनगर आणि चिंचवडेनगर येथील जागा ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाने प्राथमिक तयारी म्हणून रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या गुरुद्वारा परिसरातील व्यापाऱ्यांना प्राधिकरण प्रशासनाने गुरुवारी नोटीस देण्यास सुरुवात केली. बुधवारी (दि. २८) रोजी नोटीस देण्यासाठी आलेले प्राधिकरण अधिकारी यांनी काही दुकानदारांना नोटीस दिल्या होत्या. परंतु विरोधामुळे नोटिसांचे काम थांबवले होते. परंतु गुरुवारी गुरुद्वारा परिसरातील जवळपास ५० ते ६० दुकानावर नोटीस चिकटविल्या आहेत.