निवडणूक खर्च न सादर केल्याने आठ जणांना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 07:58 PM2019-04-16T19:58:30+5:302019-04-16T20:01:22+5:30
उमेदवारांनी सोमवारी सादर केलेल्या खर्चाच्या तपासणी करण्याचे काम आयोगाकडून सुरु करण्यात आले आहे.
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा खर्च सादर न केलेल्या आठ उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस बजाविली आहे. निवडणूक खर्च सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निदेशार्नुसार लोकसभा निवडणूक लढवणा-या उमेदवारांनी ठेवलेल्या दैनंदिन खर्च विषयक कागदपत्रे, रोख नोंदवही व बँक नोंदवही याची तपासणी होते. मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या कागदपत्रे दिनांक १५ एप्रिल ते २० आणि २७ एप्रिल या तीन टप्प्यात तपासणी केली जाणार आहे. उमेदवारांनी सोमवारी सादर केलेल्या खर्चाच्या तपासणी करण्याचे काम आयोगाकडून सुरु करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात खर्च सादर न केलेल्या आठ उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस बजाविली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघाठी ३२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आठ उमेदवारांनी माघार घेतली. माघार घेतलेल्या उमेदवारांनीही आपला खर्च सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे त्यांनाही खर्च सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.