PCMC | पिंपरी चिंचवडच्या महापालिका आयुक्तांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 02:09 PM2022-11-14T14:09:36+5:302022-11-14T14:10:21+5:30

महापालिका आयुक्तांना नोटीस बजावत आयोगाने ही माहिती मागविली...

Notice of National Commission for Scheduled Castes to Municipal Commissioner of Pimpri Chinchwad | PCMC | पिंपरी चिंचवडच्या महापालिका आयुक्तांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची नोटीस

PCMC | पिंपरी चिंचवडच्या महापालिका आयुक्तांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची नोटीस

googlenewsNext

पिंपरी : आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना हक्काचे अतिरिक्त वेतन दिले नाही, याबाबतची माहिती सात दिवसांत देण्याची सूचना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. महापालिका आयुक्तांना नोटीस बजावत आयोगाने ही माहिती मागविली आहे. ॲड. सागर चरण यांनी याचिका दाखल केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील सार्वजनिक सुटीच्या दिवशी काम केल्यानंतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतन दिले जाते. यंदा महात्मा गांधी जयंती ते घटस्थापनापर्यंत काम करणाऱ्या कामगारांना दिवाळीपूर्वी अतिरिक्त वेतन देणे अपेक्षित होते. मात्र, काही क्षेत्रीय कार्यालय वगळता इतर क्षेत्रीय कार्यालयाकडून त्याची अंमलबजावणी झाली नाही.

ऐन दिवाळीत वेतनापासून कामगार वंचित

सफाई कर्मचाऱ्यांची यातना महापालिका अधिकाऱ्यांना समजत नाही, त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे वेळेत मिळण्यापासून वंचित ठेवले जात आहे. सफाई कर्मचारी लाभापासून वंचित आहेत. या अतिरिक्त मेहनतानाचा वापर काही कर्ज फेडण्यासाठी, काही शिक्षण शुल्क भरण्यासाठी, काही आपल्या मुला-मुलींच्या लग्नासाठी करतात व इतर, परंतु अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे यावेळी प्रत्येक कर्मचाऱ्यांची नशिबात निराशा आलेली आहे. कामगारांना ऐन दिवाळी सणालाच हक्काच्या वेतनापासून वंचित राहावे लागले. त्याबाबत ॲड. सागर चरण यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे याचिका सादर केली.

आयोगाने चरण यांच्या तक्रारीची दखल घेऊन आयुक्त शेखर सिंह यांना नुकतीच नोटीस पाठवली आहे. त्यामध्ये नमूद केले आहे की, संविधानाच्या कलम ३३८ नुसार या तक्रारीची आयोगाकडून दखल घेऊन संबंधित प्रकरणाची तपासणी केली जाणार आहे. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांच्या आत संबंधित कामगारांच्या वेतनाबाबत काय कार्यवाही केली, याचे उत्तर आयोगाकडे पाठवावे. आयोगाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पालिका प्रशासन अडचणीत आले असून आयोगाकडून पुढील कार्यवाही काय केली जाते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

- सागर चरण, पिंपरी-चिंचवड

Web Title: Notice of National Commission for Scheduled Castes to Municipal Commissioner of Pimpri Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.