सदनिका खाली करण्याच्या नोटिसा
By admin | Published: April 29, 2017 04:07 AM2017-04-29T04:07:02+5:302017-04-29T04:07:02+5:30
रेंजहिल्स, खडकी येथील इतर आस्थापनांतील कामगार रहिवाशांना १५ दिवसांच्या आत ते राहत असलेल्या सदनिका रिकाम्या
खडकी : रेंजहिल्स, खडकी येथील इतर आस्थापनांतील कामगार रहिवाशांना १५ दिवसांच्या आत ते राहत असलेल्या सदनिका रिकाम्या करण्याची नोटीस दारुगोळा फॅक्टरी व्यवस्थापनाने दिली आहे. त्यामुळे कर्मचारी व कुटुंबामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
रेंजहिल्समध्ये कर्मचाऱ्यांसाठी साधारण साडेतीन ते चार हजार सदनिका आहेत. संरक्षण विभागाच्या बीईजी सदर्न कमांड एमईएस कॅन्टोन्मेंट यातील कर्मचारी सदनिकेत मागील १२ ते १५ वर्षांपासून राहत आहेत. वीज, पाणी देखभाल व परवाना शुल्क ते नियमित भरत आहेत. कामगारांनीयेथील स्थानिक नगरसेविका कार्तिकी हिवरकर यांची भेट घेतली. सर्व प्रकार हिवरकर यांनी ऐकून घेतल्यानंतर कामगारांसहित हिवरकर यांनी खासदार अनिल शिरोळे यांची भेट घेऊन सर्व हकिगत सांगितल्यानंतर शिरोळे हे लवकरच संरक्षणमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन कामगारांच्या सदनिकेचा प्रश्न मांडून त्यावर योग्य तोडगा काढण्यात येईल, असे शिरोळे यांनी हिवरकर यांना सांगितले आहे.(वार्ताहर)