आता निगडी भक्ती शक्ती चौकापर्यंत मेट्रो; केंद्र सरकारने दिला हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 03:28 PM2017-12-22T15:28:18+5:302017-12-22T15:30:46+5:30

पुणे मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन साकडे घातले. त्यास केंद्राने हिरवा कंदील दिल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

Now Metro to the Nigdi Bhakti Shakti Chowk; Green signal given by the central government | आता निगडी भक्ती शक्ती चौकापर्यंत मेट्रो; केंद्र सरकारने दिला हिरवा कंदील

आता निगडी भक्ती शक्ती चौकापर्यंत मेट्रो; केंद्र सरकारने दिला हिरवा कंदील

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्या टप्प्यामध्येच निगडीपर्यंत मेट्रो सुरु व्हावी, ही पिंपरी चिंचवडमधील नागरिकांची मागणी मार्गाचा डी. पी. आर. बनविण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या जातील : हरदीपसिंग पुरी

पिंपरी : पुणे मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन साकडे घातले. पुणे मेट्रोला स्वारगेट ते निगडी भक्ती शक्ती चौकापर्यंत मंजुरी देण्याची मागणी केली. त्यास केंद्राने हिरवा कंदील दिल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या वतीने पुणे महानगर क्षेत्रातील सार्वजनिक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील मेट्रो रेल्वे कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य शासनाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मार्ग क्रमांक १ स्वारगेट ते पिंपरीला मान्यता दिली. पहिल्या टप्प्यामध्येच निगडी भक्ती शक्ती चौकापर्यंत मेट्रो सुरु व्हावी, ही पिंपरी चिंचवडमधील नागरिकांची मागणी आहे. या मागणीचा विचार करून २९ आॅक्टोबर २०१३च्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाने सादर केलेला प्रस्तावाला मंजुरी दिली असून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दि. २ सप्टेंबर २०१४ला मंजुरीसाठी पाठवला होता. प्रस्तावास केंद्र सरकार कडून मंजुरी मिळावी व केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी आर्थिक निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी हरदीपसिंग पुरी यांना दिले.
खासदार बारणे म्हणाले, स्वारगेट ते निगडी भक्ती शक्ती चौकापर्यंत मेट्रो रेल्वे सेवा करण्यासाठी मी अनेक दिवस पाठपुरावा करीत आहे. या संदर्भात या अगोदरही लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून संबंधित मंत्रालयाला पत्र व्यवहार केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी पत्र पाठवून प्रकल्पाचा खर्च उचलण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाने २९ आॅक्टोबर २०१३ रोजीच स्वारगेट ते निगडी भक्ती शक्ती चौक या भागाला मंजुरी दिली आहे. पिंपरी ते भक्ती शक्ती या वाढीव मेट्रो रेल्वे मार्गाला होणार खर्च कोणी करायचा त्या मध्ये महाराष्ट्र शासन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व केंद्रसरकार आपला किती आर्थिक सहभाग देणार यावर चर्चा सुरु आहे. महानगरपालिका या प्रकल्पासाठी खर्च करण्यास तयार असल्यास केंद्र सरकारच्या वतीने तत्काळ मंजुरी मिळणार आहे.
त्यावर हरदीपसिंग पुरी म्हणाले, की राज्य शासन व महापालिका आर्थिक सहभाग उचलण्यास तयार असेल तर पिंपरी ते निगडी भक्ती शक्ती चौकापर्यंतच्या मेट्रो मार्गाला तत्काळ मंजुरी दिली जाईल. या मार्गाचा डी. पी. आर. बनविण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या जातील.

Web Title: Now Metro to the Nigdi Bhakti Shakti Chowk; Green signal given by the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.