आता रेशन दुकानातच भरा फोन, वीज अन् पाणी बिल...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 11:47 AM2022-11-07T11:47:47+5:302022-11-07T11:50:02+5:30

रेशन दुकातात मिळू शकतात या सुविधा....

Now pay the phone, electricity and water bill at the ration shop itself | आता रेशन दुकानातच भरा फोन, वीज अन् पाणी बिल...!

आता रेशन दुकानातच भरा फोन, वीज अन् पाणी बिल...!

Next

पिंपरी : रेशन दुकानांमध्ये महा ई सेवा केंद्राप्रमाणे फोन, वीज अन् पाणीपट्टी भरण्याची सेवा नागरिकांना मिळणार आहे. ‘मल्टीपर्पज’ सेवा सुरू करण्यासाठी राज्य शासनाने मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमासाठी पुरवठा विभागाने तयारी सुरू केली आहे. ग्रामीण व शहरी भागासाठी हे केंद्र असेल. नागरिकांना सर्वव्यापी सुविधा मिळण्यासाठी व रेशन दुकानदारांना काही प्रमाणात उत्पन्नाचे साधन मिळण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

रेशन दुकातात मिळू शकतात या सुविधा- फोनबिल भरणे, वीजबिल भरणे, पाणीपट्टी भरण्यासाठी रेशन दुकानात सुविधा मिळणार आहेत. राज्यभरात हा उपक्रम कमी- अधिक प्रमाणात सुरू झाला आहे. यांसह आगामी काळात मनी एक्स्चेंज व इतर सुविधाही मिळू शकतील.

दुकानांची नोंदणी

पुरवठा विभागाकडून या उपक्रमासाठी रेशन दुकानांची नोंदणी करण्यात येत आहे. त्यांचे ‘ऑनलाइन आयडी’ तयार झाले आहेत. शहरातील रेशन दुकानांनाही या उपक्रमात नोंदणी करण्यात येणार आहे.

सेवा केंद्राचे देणार प्रशिक्षण

रेशन दुकानात सेवा केंद्र सुरू करण्यासाठी पुरवठा विभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. सेवा केंद्र चालवायचे कसे, याबाबत दुकानदारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात काही दुकानादारांना प्रशिक्षण देऊन हे ‘मल्टीपर्पज’ सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर उर्वरित दुकानदारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

शासन आदेशानुसार उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘मल्टिपर्पज’ सेवाकेंद्र सुरू करण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी काही रेशन दुकानदारांनीही तयारी दर्शवली आहे. पहिल्या टप्प्यात त्यांच्या दुकानांची नोंदणी करून त्यांचे ‘ऑनलाइन आयडी’ तयार करण्यात येणार आहेत.

- दिनेश तावरे, नायब तहसीलदार, पुरवठा विभाग

Web Title: Now pay the phone, electricity and water bill at the ration shop itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.