आरटीओ कर्मचाऱ्यांना आता गणवेश, आरटीओचा पथदर्शी उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 02:39 AM2019-02-04T02:39:53+5:302019-02-04T02:40:21+5:30

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयातील कर्मचाºयांनी एकत्रित येऊन एक ड्रेसकोड निश्चित केला आहे. कार्यालयातील महिला, पुरुष कर्मचाºयांना गडद निळ्या रंगाचा गणवेश दिला आहे.

Now, RTO employees' uniforms, RTO's pilot project | आरटीओ कर्मचाऱ्यांना आता गणवेश, आरटीओचा पथदर्शी उपक्रम

आरटीओ कर्मचाऱ्यांना आता गणवेश, आरटीओचा पथदर्शी उपक्रम

Next

- प्रकाश गायकर
पिंपरी - पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयातील कर्मचाºयांनी एकत्रित येऊन एक ड्रेसकोड निश्चित केला आहे. कार्यालयातील महिला, पुरुष कर्मचाºयांना गडद निळ्या रंगाचा गणवेश दिला आहे. गडद पँट, आकाशी रंगाचा शर्ट आणि कोट असा पेहराव असणार आहे. कर्मचाºयांना गणवेश निश्चित करणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच आरटीओ कार्यालय असल्याचा दावा, कर्मचाºयांनी केला आहे.
राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयांमध्ये प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, तसेच सहायक मोटार निरीक्षक, मोटार वाहन निरीक्षक हे खाकी कपड्यांमध्ये असतात. तर उर्वरित कर्मचारी हे इतर वेशांत असतात. सद्य:स्थितीमध्ये आरटीओच्या सर्वच कार्यालयांमध्ये कर्मचाºयांची कमतरता आहे. त्यामुळे इतर कर्मचाºयांवर मोठ्या प्रमाणावर कामाचा ताण असतो. त्यामुळे कामकाजामध्ये सुसूत्रता दिसून येत नाही. कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता यावी, कर्मचाºयांमध्येही एकसंघ भावना निर्माण व्हावी यासाठी त्यांना स्वतंत्र गणवेश असावा, ही कल्पना उपप्रादेशिक अधिकारी आनंद पाटील यांना सूचली. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर यांच्या मदतीने त्यांनी ही कल्पना कर्मचाºयांपुढे मांडली, कर्मचाºयांनीकल्पनेचे स्वागत केले. त्यानुसार नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताकदिनी गणवेशाचे वितरण केले आहे.
कार्यालयामध्ये १२ महिला आणि १४ पुरुष कर्मचारी कार्यरत आहेत. त्या सर्वांना नवीन गणवेश दिला आहे. गडद निळ्या रंगाची पँट, आकाशी रंगाचा शर्ट आणि कोट हा गणवेश सर्व कर्मचाºयांना दिला आहे. एकसंघता आल्याने कामात उत्साह येणार असल्याचे कर्मचाºयांनी सांगितले.

कर्मचाºयांनी एकत्रित येऊन ही संकल्पना राबविली आहे. एकच गणवेश असल्याने कार्यालयामध्ये एक सकारात्मक चित्र दिसत आहे. तसेच कामामध्ये सुसूत्रताही जाणवत आहे. कामासाठी आलेले नागरिक यामुळे थेट कर्मचाºयांना भेटू शकतील त्यामुळे एजंटपासून कार्यालय मुक्त होईल.’’
- आनंद पाटील,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Now, RTO employees' uniforms, RTO's pilot project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.