पिंपरीत सक्रीय रुग्णसंख्येत होतीये घट! रविवारी शहरात ५४२ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 08:00 PM2021-05-30T20:00:39+5:302021-05-30T20:00:54+5:30

दिवसभरात ४१९ रुग्णांची वाढ, सक्रिय रुग्णसंख्येचा आलेख अडीच हजारांवर

The number of active patients in Pimpri is declining! On Sunday, 542 people were released from the city | पिंपरीत सक्रीय रुग्णसंख्येत होतीये घट! रविवारी शहरात ५४२ जण कोरोनामुक्त

पिंपरीत सक्रीय रुग्णसंख्येत होतीये घट! रविवारी शहरात ५४२ जण कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देपिंपरीत आतापर्यंत २ लाख ४० हजार ९०२ जणांनी केली कोरोनावर मात

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरात सक्रिय रुग्णसंख्येत घट झाल्याने सकारात्मक चित्र दिसू लागले आहे. कोरोनाबाधितांचा आलेख कमी होत असून कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजारांवर आली आहे. रविवारी दिवसभरात ४१९ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ५४२ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. या सर्वांमध्ये २० जणांनी जीव गमावला आहे.

महापालिकेच्या विविध रुग्णालयात ५ हजार ४४६ जणांना दाखल केले होते. सद्यस्थितीत सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ५४६ एवढी आहे. तर आतापर्यंत पाच हजार जणांना डिस्चार्ज दिला आहे.

कोरानामुक्तांचा आलेख वाढतोय  

पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचा आलेखही वाढत आहे. एकूण कोरोनामुक्तांची संख्या २ लाख ४० हजार ९०२ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ५० हजार १५३ वर गेली आहे.

२० जणांचा मृत्यू

कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या निम्याने खाली आली आहे. कालपेक्षा दोनने संख्या वाढली आहे. शहरातील २० आणि शहराबाहेरील १३ अशा एकूण ३३ जणांचा बळी घेतला आहे. त्यात तरुण आणि महिलांची, ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मृतांची संख्या ४ हजार ०४६ वर पोहोचली आहे.  

 

 

Web Title: The number of active patients in Pimpri is declining! On Sunday, 542 people were released from the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.