‘पीएफ’ बुडविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा

By admin | Published: July 16, 2017 03:48 AM2017-07-16T03:48:14+5:302017-07-16T03:48:14+5:30

कंत्राटी कामगारांची भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम त्यांच्या खात्यात न भरणाऱ्या देव स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह दोघांवर भोसरी पोलीस

Offense of contracting contractors 'PF' | ‘पीएफ’ बुडविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा

‘पीएफ’ बुडविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : कंत्राटी कामगारांची भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम त्यांच्या खात्यात न भरणाऱ्या देव स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह दोघांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष सचिन पंढरीनाथ काळे (वय ४२) आणि संस्थेचे प्रतिनिधी अशोक थोरात (दोघे, रा. चिंचवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी चंद्रकांत इंदलकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील रस्ते आणि गटर साफसफाईचे काम खासगी ठेकेदारांकडून करून घेण्यासाठी २०१५ मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामध्ये देव स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला हे काम मिळाले. या ठेकेदार संस्थेने या कामासाठी १२ कंत्राटी कामगार पुरवावेत, असे आदेश महापालिकेने दिले. त्याबाबतचा करारनामा संस्थेचे अध्यक्ष सचिन पंढरीनाथ काळे यांच्यासोबत महापालिकेने केला होता.

Web Title: Offense of contracting contractors 'PF'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.