अधिकारी, कर्मचाऱ्यांनो लसीचे दोन्ही डोस घ्या, अन्यथा वेतन स्थगित; पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 01:34 PM2021-06-29T13:34:14+5:302021-06-29T13:34:20+5:30

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी २० जुलैपर्यंत लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. अन्यथा जुलै महिन्याचा पगार स्थगित ठेवणार

Officers, employees take both doses of vaccine, otherwise salary suspended; Warning of Pimpri Chinchwad Municipal Commissioner | अधिकारी, कर्मचाऱ्यांनो लसीचे दोन्ही डोस घ्या, अन्यथा वेतन स्थगित; पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांचा इशारा

अधिकारी, कर्मचाऱ्यांनो लसीचे दोन्ही डोस घ्या, अन्यथा वेतन स्थगित; पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांचा इशारा

Next
ठळक मुद्देमहापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आरोग्य निरोगी रहावे व कोरोना आजारापासून संरक्षण मिळावे. याकरिता महापालिका कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्यात आले आहेत

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी आणि मानधनावरील, ठेकेदारीपध्दतीच्या बहुतांश कंत्राटी कर्मचा-यांनी आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले नाहीत. या कर्मचाऱ्यांनी २० जुलैपर्यंत लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. अन्यथा जुलै महिन्याचा पगार स्थगित ठेवण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे. 

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर गट अ ते ड संवर्गात (शिक्षक, कर्मचाऱ्यांसह) ७ हजार ४७९ अधिकारी, कर्मचारी कामकाज करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी महापालिका स्तरावर विविध उपाययोजना युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहेत. महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आरोग्य निरोगी रहावे व कोरोना आजारापासून संरक्षण मिळावे. याकरिता महापालिका कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्यात आले आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घेण्याबाबत तीनवेळा कळविण्यात आले आहे. तरी, देखील अद्यापपर्यंत बहुतांशी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. 

शाखाप्रमुख, विभागप्रमुख यांनी आपल्या नियंत्रणाखालील सर्व अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त झालेले कर्मचारी (पेन्शनधारक), मानधनावरील, ठेकेदारीपध्दतीच्या बहुतांश कंत्राटी कर्मचा-यांनी जर आद्यपपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसेल. तर, त्यांनी २० जुलैपर्यंत लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. अन्यथा जुलै महिन्याचा पगार स्थगित करण्याबाबत विचार करण्यात येईल, असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे. सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्या बाबतीत लेखा विभागाकडून संबंधितास कळविण्यात यावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

 

Web Title: Officers, employees take both doses of vaccine, otherwise salary suspended; Warning of Pimpri Chinchwad Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.