अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By admin | Published: July 17, 2017 04:08 AM2017-07-17T04:08:25+5:302017-07-17T04:08:25+5:30

शुक्रवारपासून (दि १४) दत्त मंदिर परिसर, वाकड येथील कित्येक सोसायट्यांचा विद्युतपुरवठा गेले ३६ ते ४८ तासांपेक्षा अधिक वेळ

The officers took control | अधिकाऱ्यांना धरले धारेवर

अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाकड : शुक्रवारपासून (दि १४) दत्त मंदिर परिसर, वाकड येथील कित्येक सोसायट्यांचा विद्युतपुरवठा गेले ३६ ते ४८ तासांपेक्षा अधिक वेळ अचानक खंडित झाल्याने रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सातत्याने पाठपुरावा करूनदेखील समस्या सुटत नसल्याचे अखेर रहिवाशांनी महावितरण अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करून समस्यांचा पाढा वाचला.
वाकडमधील दत्तात्रय देशमुख (मॅक्झिमा सोसायटी), युवराज हुगे व बाळकृष्ण कलाटे (नंदन इन्स्पेरा सोसायटी) या रहिवाशांनी या बैठकीच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. वाकडच्या विविध सोसायट्यांतील २५० पेक्षा अधिक रहिवासी सहभागी झाले होते. बैठकीला महावितरणकडून सांगवी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एन. के सूर्यवंशी आणि सहायक अभियंता प्रकाश नाईकवाडे हे उपस्थित होते.
वेदान्त, आयकॉन ग्रीन, गोल्ड फिंगर या खंडित वीजपुरवठ्याची झळ बसलेल्या सोसायट्यामध्ये तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. या व्यतिरिक्त विद्युतपुरवठ्यातील समस्यांविषयी अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विद्युतपुरवठा वारंवार खंडित होणे, खंडित पुरवठा कमी दाबाने पुन:स्थापित झाल्याने घरातील टीव्ही, फ्रीज, संगणक आदी मौल्यवान उपकरणांचे नुकसान होणे. लिफ्ट बंद पडणे, पाणीपुरवठा न होणे, मोबाइल चार्जिंग न होणे, गिझर, फ्रीज न चालणे अशा समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे नमूद केले. याशिवाय परिसरात अनेक डीपीला झाकणे नाहीत, विजेची वाढीव बिले व त्याचे तत्काळ निराकरण होत नाही अशा समस्या नागरिकांनी मांडल्या.
येथील वीजपुरवठा यंत्रणा खूप जुनी असल्याने तिची देखभाल आणि नियंत्रण अत्यंत जिकीरीचे झाले आहे. या ठिकाणी काम करताना महावितरण कर्मचाऱ्यांचे प्रसंगी प्राण धोक्यात येण्याचीही शक्यता असते. येथील पुरवठा हिंजवडी आणि जगताप डेअरी येथील केवळ वाहिन्यावरून गेली कित्येक वर्षांपासून होत आहे. या कालावधीत ग्राहकांचे संख्येत प्रचंड वाढ झाल्याने व्यवस्थेवर ताण येत आहे. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आर्द्रतेमुळे पुरवठ्यावर परिणाम होऊन नेमक्या कोणत्या ठिकाणी आर्द्रता निर्माण झाली आहे हे शोधणे अवघड जात आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाला विलंब होतो असे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले.
सलग दोन दिवस बत्ती गुल असल्याने रहिवाशांची घालमेल सुरु असल्याने शिवसेनेचे शहरप्रमुख आणि स्थानिक नगरसेवक राहुल कलाटे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला आहे. महावितरणच्या सातत्याने अनेक चुका सुरूच असल्याने गैरसोय सुरु आहे. लवकर तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.

Web Title: The officers took control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.