अधिकाऱ्याची बदली : तरुणीच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 01:56 AM2018-09-27T01:56:24+5:302018-09-27T01:56:42+5:30

हिंजवडीतील खासगी वसतिगृहात राहत असलेल्या अभियंता तरुणीच्या खोलीत शिरून विनयभंगाचा प्रयत्न करणाºया आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Officer's Transfer: Crime Record for Molestation of Girl | अधिकाऱ्याची बदली : तरुणीच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा नोंद

अधिकाऱ्याची बदली : तरुणीच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा नोंद

Next

पिंपरी  - हिंजवडीतील खासगी वसतिगृहात राहत असलेल्या अभियंता तरुणीच्या खोलीत शिरून विनयभंगाचा प्रयत्न करणाºया आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ९ सप्टेंबरला घडलेल्या या घटनेची दखल २५ सप्टेंबरला घेण्यात आली. या प्रकाराबद्दल पोलीस आयुक्त आर. के. पद्नाभन यांनी संताप व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही कॅमेºयात आरोपी कैद झाला असून, त्याचा शोध घेण्याचे आव्हान हिंजवडी पोलिसांपुढे आहे. तेथील एका पोलीस अधिकाºयाची आयुक्तांनी तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली आहे. इतरांची खातेनिहाय चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार आहे.
महिलांच्या वसतिगृहात जाऊन तेथे राहणाºया तरुणींना काही अडचणी आहेत का, याबद्दलची माहिती घेण्यासाठी महिला पोलीस पथक पाठविण्याची मोहीम आयुक्त पद्मनाभन यांच्या आदेशानुसार पोलिसांनी हाती घेतली. त्यातून विनयभंगाच्या या गंभीर घटनेबद्दल पोलिसांनी कसा निष्काळजीपणा दाखविला, ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आली.
विनयभंगाची घटना घडली आहे, मात्र पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल नाही. ही बाब समजल्यानंतर आयुक्त पद्मनाभन यांना धक्का बसला. त्यांनी संबंधित पोलीस अधिकाºयांना पीडित तरुणीशी संपर्क साधून आपल्याशी बोलण्यास सांगा, असा निरोप दिला. पोलीस आयुक्तांनी सांगितले असताना, तेथील पोलीस अधिकारी त्यांना चुकीची माहिती देऊ लागले. त्या तरुणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तिच्याशी संपर्क होत नाही, तिचा मोबाइल आऊट आॅफ रेंज असल्याने आपला निरोप पोहोचविणे शक्य होत नाही, असे सांगून या घटनेकडील आयुक्तांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला.
हिंजवडीतील या घटनेसंदर्भात तरुणीने वकिलामार्फत थेट पोलीस आयुक्तांनाच नोटीस दिली असल्याने आयुक्तांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले. हिंजवडीतील पोलीस अधिकाºयांकडून योग्य प्रकारे प्रतिसाद मिळण्याऐवजी टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी स्वत:च तक्रारदार तरुणीची भेट घेण्यास जाण्याचा निर्णय घेतला. हिंजवडीतील त्या वसतिगृहाच्या इमारतीत जाऊन त्यांनी संबंधित तरुणीशी चर्चा केली.

पोलिसांनी तरुणीची फिर्याद घेण्यास टाळाटाळ केल्याचे सांगत तक्रार देण्यास गेल्यानंतर तब्बल चार तास पोलिसांनी ताटकळत ठेवले. तक्रार घेतली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव वकिलामार्फत आयुक्तालय कार्यालयास नोटीस पाठविणे भाग पडले, हे वास्तव तरुणीने पोलीस आयुक्त पद्मनाभन यांना सांगितले. हे ऐकून संतप्त झालेल्या आयुक्तांनी सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे यांची तडकाफडकी बदली केली. या प्रकरणातील दोषींची चौकशी सुरू आहे.

Web Title: Officer's Transfer: Crime Record for Molestation of Girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.