अधिकाऱ्यांचे मंत्रालयात खेटे

By admin | Published: June 3, 2016 12:37 AM2016-06-03T00:37:08+5:302016-06-03T00:37:08+5:30

आयुक्त राजीव जाधव यांच्या बदलीनंतर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, सहायक आयुक्तांनाही बदलीचे वेध लागले असून, इच्छितस्थळी बदली व्हावी, यासाठी अधिकाऱ्यांच्या मंत्रालयात

Officials at the Mantralaya | अधिकाऱ्यांचे मंत्रालयात खेटे

अधिकाऱ्यांचे मंत्रालयात खेटे

Next

पिंपरी : आयुक्त राजीव जाधव यांच्या बदलीनंतर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, सहायक आयुक्तांनाही बदलीचे वेध लागले असून, इच्छितस्थळी बदली व्हावी, यासाठी अधिकाऱ्यांच्या मंत्रालयात फेऱ्या सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे शहर अभियंता पदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत चर्चा रंगली आहे. राज्यभरात बदल्यांचे सत्र सुरू आहे. आयुक्त राजीव जाधव यांची बदली होऊन त्यांच्या जागी दिनेश वाघमारे रुजू झालेले आहेत.
शहर अभियंत्यांकडे स्थापत्य, बांधकाम परवाना, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, पाणीपुरवठा विभागाचा पदभार होता. या कामांचेही विभाजन केले आहे. काही अधिकाऱ्यांच्या खात्यांतर्गत बदल्या केल्या आहेत.
रवींद्र दुधेकर यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाच्या सह शहर अभियंता पदाचा भार सोपविण्यात आला आहे. तसेच बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागात समन्वय अधिकारी म्हणून सह शहर अभियंता अयुबखान पठाण यांची नियुक्ती केली आहे. तसेच क प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी, क्रीडा विभागाचे प्रमुख दत्तात्रय फुंदे यांचा पदभार सहायक आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे सोपविला आहे.
फ क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार गावडेंकडे होता. तो ड क्षेत्रीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी मनोज लोणकर यांच्याकडे सोपविला आहे.
तर फ क्षेत्रीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी विजय वाघमारे यांच्याकडे ड क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार दिला आहे. या अधिकाऱ्यांनी ३ जूनपासून बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असा आदेश आयुक्तांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Officials at the Mantralaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.