जुन्या इमारतीच्या सीमाभिंतीला गेले तडे; पण प्रशासन दुर्घटनेनंतरच होणार का जागे?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 01:39 PM2019-07-13T13:39:54+5:302019-07-13T13:40:47+5:30
पुण्यामध्ये सीमाभिंत पडल्यामुळे अनेक निर्दोष लोकांचे जीव गेले आहेत. ही घटना ताजी असतानाच मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील नागुभाऊ गतिराम बारणे शाळेच्या सीमाभिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत.
शीतल मुंडे-
पिंपरी : थेरगाव येथे महापालिकेची मुला-मुलींची नागुभाऊ गतिराम बारणे ही शाळा आहे. शाळेची इमारत तीन मजली आहे. मात्र विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मोठे मैदान नाही. त्याचप्रमाणे इमारत अतिशय जुनी झालेली आहे. शाळेच्या सीमाभिंतीला तडे गेलेले आहेत, घाणीचे साम्राज्य आहे.
पुण्यामध्ये सीमाभिंत पडल्यामुळे अनेक निर्दोष लोकांचे जीव गेले आहेत. ही घटना ताजी असतानाच मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील नागुभाऊ गतिराम बारणे शाळेच्या सीमाभिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत. मात्र त्याच्याकडे शिक्षण विभाग व शाळा प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे. शाळेच्या अतिशय धोकादायक असलेल्या भिंतीजवळ लहान मुले खेळत असताना पाहणीमध्ये आढळले. नागुभाऊ गतिराम बारणे शाळा तीन मजली आहे. वर्ग खोल्या ह्या मोठ्या आहेत. मात्र मुलांच्या तुलनेत वर्ग खोल्यांमध्ये बॅचची संख्या कमी आहे. यामुळे काही मुलांनाजमिनीवर बसून शिक्षण घ्यावे लागत आहेत. शाळेच्या तिसºया मजल्यावरील अनेक खोल्यांमध्ये तुटलेल्या बाखांचा खच बघायला मिळतो.
शाळेच्या परिसरामध्ये जागोजागी कचºयाचे साम्राज्य दिसते. याठिकाणी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.
.....
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र ज्या ठिकाणी पाण्याची टाकी ठेवण्यात आलेली आहे. त्या संपूर्ण परिसरामध्ये भिंतींना शेवाळ आलेले आहे. ज्या टाकीमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी ठेवण्यात आलेले आहे. त्या टाकीलादेखील शेवाळ आलेले आहे. अशा प्रकारचे दूषित पाणी विद्यार्थ्यांना प्यावे लागते.
.............
शाळेमधील बहुतांश विद्यार्थ्यांचे गणवेश जुने व फाटलेले आहेत. शाळा सुरू होऊन एक महिना झाला आहे. तरीदेखील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना फाटलेल्या गणवेशामध्येच शाळेमध्ये यावे लागत आहे. ..
................
शाळेचा परिसर दररोज स्वच्छ करण्यात येत नाही. शाळेच्या परिसरामध्ये कचरा दिसतो. वर्गखोल्यांच्या बाहेर कचरा पडलेला असतो. तुटलेले बँच, फळे, खुर्ची अशा प्रकारच्या अनेक निकामी वस्तू पडून आहेत. ..