महामार्गालगत जुन्या मोटारी विक्रीची दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 10:59 PM2018-12-20T22:59:40+5:302018-12-20T23:00:38+5:30

नाशिकफाटा चौक : उड्डाणपुलाखाली अतिक्रमणामुळे वाहतूककोंडी

Old car sales shops on the highway | महामार्गालगत जुन्या मोटारी विक्रीची दुकाने

महामार्गालगत जुन्या मोटारी विक्रीची दुकाने

Next

पिंपरी : शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, अपघातांच्या घाटनांवर नियंत्रण यावे, या उद्देशाने जुना पुणे-मुंबई महामार्ग व नाशिक महामार्गाला जोडण्यासाठी प्रशस्त उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. बाहेरून येणारी वाहने उड्डाणपुलावरून जात असल्याने अंतर्गत मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. मात्र उपलब्ध झालेल्या महामार्गालगतच्या जागेवर जुन्या मोटारींची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यांच्या अतिक्रमणांमुळे उड्डाणपुलाखालील रस्त्यांवर अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर कासारवाडीत नाशिकफाटा येथे उद्योजक जेआरडी टाटा उड्डाणपूल महापालिकेने उभारला आहे. पुणे-मुंबई आणि पुणे - नाशिक या महामार्गाने ये-जा करणाºया वाहनांसाठी हा पूल अत्यंत उपयुक्त ठरला आहे. त्याचबरोबर बाहेरील वाहने उड्डाणपुलावरून जात असल्याने अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीवर येणारा ताण कमी झाला आहे. या रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ कमी होण्यास एकीकडे उड्डाणपूल उपयुक्त ठरला असताना, उड्डाणपुलाखाली आणि काही अंतर पुढे रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूककोंडी होऊन अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

नाशिकफाटा येथील उड्डाणपुलाखाली मोटारीचे सुटे भाग विक्री करणारे व्यावसायिक, टायर विक्री तसेच मोटारीचे कुशन तयार करणारे कारागीर यांची दुकाने आहेत़ शिवाय खाद्यपदार्थ विक्रीच्या टपºया, पत्राशेड यांची भाऊगर्दी झालेली आहे. उड्डाणपुलाच्या प्रकल्पानंतर ही गर्दी कमी होईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती़ कासारवाडी रेल्वे स्टेशनलगतची अतिक्रमणे महापालिकेने हटवली होती. ज्यांचे अतिक्रमण आहे, त्यांना नोटीस दिल्या होत्या. तरीही या परिसरातील अतिक्रमणांवर नियंत्रण आलेले नाही.
या मार्गावर बीआरटी आणि मेट्रोचे काम सुरू आहे़, त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत़ वाहनचालकांना या मार्गावर कसरत करत जावे लागत असताना, अतिक्रमणांमुळे आणखी धोकादायक परिस्थितीतून मार्ग काढणे भाग पडते.

अतिक्रमण : आकुर्डी, निगडीतही पदपथावर दुकाने
केवळ नाशिकफाटा , कासारवाडीच नव्हे तर मुंबई-पुणे महामार्गावर कासारवाडी ते निगडीपर्यंत अशाच पद्धतीने रस्ते आणि पदपथ जुन्या मोटारींची विक्री करणाºयांनी ताब्यात घेतले आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या अधिकारी, कर्मचाºयांना मात्र त्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. कारवाई करण्याचे धोरण अवलंबले जात नाही. आकुर्डी, निगडी या ठिकाणीसुद्धा दुचाकी वाहनविक्रीची दुकाने रस्त्यावर थाटली असल्याचे दिसून येते.

Web Title: Old car sales shops on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.