जुना पुणे-मुबंई महामार्ग : वाहतूककोंडी नित्याचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 02:53 AM2017-12-02T02:53:01+5:302017-12-02T02:53:10+5:30

पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथील लोहमार्गावर उड्डाणपुलाचे, तसेच एक किलोमीटर लांबीच्या एलिव्हेटेड रस्त्याचे काम सुरू असून, मे महिन्याच्या अखेरीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 The Old Pune-Mumbai Highway: The Road to the Travelers | जुना पुणे-मुबंई महामार्ग : वाहतूककोंडी नित्याचीच

जुना पुणे-मुबंई महामार्ग : वाहतूककोंडी नित्याचीच

Next

देहूरोड : पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथील लोहमार्गावर उड्डाणपुलाचे, तसेच एक किलोमीटर लांबीच्या एलिव्हेटेड रस्त्याचे काम सुरू असून, मे महिन्याच्या अखेरीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही या रस्त्यावरून जड, अवजड वाहनांची वाहतूक बिनदिक्कतपणे सुरूअसल्याने तसेच बेशिस्त वाहनचालक रस्त्यावर व रस्त्यालगत चारचाकी व दुचाकी वाहने उभी करीत असल्याने नियमित वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र दिसत आहे.
वारंवार होत असलेल्या वाहतूककोंडीने स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, काम सुरू असल्याने अरुंद रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला आहे .
पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते देहूरोड दरम्यानच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून जड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. ही वाहतूक कात्रज बाह्यवळण मार्ग, भूमकर चौक, वाकडमार्गे बिर्ला हॉस्पिटल, स्पाईन रोडमार्गे भक्ती शक्ती चौकाकडून वळविण्यात आल्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी राजेश मुठे यांनी दिलेआहेत. मात्र या रस्त्यावरून जड, तसेच अवजड मालाची वाहतूक करणारी वाहने ये-जा करीत असल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येत आहे. ठेकेदाराने देहूरोड व निगडी येथे मुख्य रस्त्यावर अडथळे उभारून जड वाहनांना प्रवेश बंद असल्याचे फलकही लावले आहेत. मात्र दोन्ही ठिकाणी ठेकेदाराने सुरुवातीला नेमलेले कामगार काढून घेतल्याने वाहनांना मोकळे रान मिळाले आहे. बंदी असलेल्या रस्त्यावरून सर्व वाहने ये-जा करताना दिसत आहेत. जड वाहतूक सुरू असल्याने स्थानिक नाराजी व्यक्त करीत आहेत. तसेच पोलिसांनी दंडात्मक कारवाई केल्यास जड वाहतूक बंद होऊ शकते, असे मत व्यक्त केले आहे.

वाहतुकीला अडथळा : रस्त्याकडेलाच पार्किंग

देहूरोड ते निगडी दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याने देहूरोड येथे जुन्या बँक आॅफ इंडिया मुख्य चौकात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने दिवसभर दोन वॉर्डन नेमण्यात आलेले आहेत. चौकातील वाहतूककोंडी कमी झाली असली, तरी देहूरोड परिसरात रस्त्यावरून जड वाहतूक बंदी आदेश झुगारून वाहतूक होत असल्याने अरुंद महामार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच विविध कामे सुरू असल्याने जड वाहनांमुळे परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, अनेकदा वाहतूककोंडी होत आहे. त्यातच काही मोटारचालक, दुचाकीस्वार रस्त्यावर, तसेच रस्त्याकडेला वाहन उभे करीत असल्याने कोंडीत भर पडत आहे.

Web Title:  The Old Pune-Mumbai Highway: The Road to the Travelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.