लायन्स उपप्रांतपालपदी ओमप्रकाश पेठे
By admin | Published: March 26, 2017 01:42 AM2017-03-26T01:42:48+5:302017-03-26T01:42:48+5:30
दि इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ लायन्स क्लबच्या वतीने विनिंग स्ट्रोक या विषयावर प्रांतीय परिषद झाली.
पिंपरी : दि इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ लायन्स क्लबच्या वतीने विनिंग स्ट्रोक या विषयावर प्रांतीय परिषद झाली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उपप्रांतपालपदाची निवडणूक झाली. त्यात पिंपरी-चिंचवडमधील ओमप्रकाश पेठे यांची निवड झाली.
पिंपरी-चिंचवड शहरात लायन्स क्लबची प्रांतीय परिषद संपन्न झाली. भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात ही परिषद झाली. परिषदेत पुणे, अहमदनगर, नाशिक या परिसरातील १२६ लायन्स क्लब सहभागी झाले होते. प्रारंभी चर्चासत्र झाले. या पदासाठी संजय गुगळे आणि ओमप्रकाश पेठे यांनी अर्ज केले होते. उपप्रांतपाल पदाच्या दुरंगी लढतीत ओमप्रकाश पेठे हे विजयी झाले. त्यानंतर या परिषदेस उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबचे संचालक विजयराज राजू, माजी संचालक नरेंद्र भंडारी, प्रेमचंद बाफना, प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, माजी प्रांतपाल फत्तेचंद रांका, जितेंद्र मेहता, नियोजित प्रांतपाल गिरीश मालपाणी, उपप्रांतपाल रमेश शहा आदी मान्यवरांच्या हस्ते पेठे व श्रद्धा पेठे यांचा सत्कार करण्यात आला. ही निवड तीन वर्षांसाठी राहणार आहे. २०१९ मध्ये प्रांतपाल म्हणून निवडणूक होणार आहे.
या वेळी पिंपरी-चिंचवड शहराला प्रथमच पेठे यांच्या रूपाने उपप्रांतपालपद मिळाले. पेठे म्हणाले, ‘‘दि इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ लायन्स क्लबच्या वतीने समाजाच्या विकासासाठी काम केले जाते. समाजोपयोगी प्रकल्प व योजना राबविण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात प्रथमच ही संधी मिळाली आहे.’’ (प्रतिनिधी)