Pune Crime | क्रेडिट कार्ड नंबर बंद करणे पडले दीड लाखाला; चिंचवडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 01:06 PM2023-03-15T13:06:31+5:302023-03-15T13:10:02+5:30
पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे...
पिंपरी : क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी गुगलवरून नंबर सर्च करून संबंधित बँकेला फोन लावला. आपल्या क्रेडिट कार्डचा पीन फोनवर बोलणाऱ्याला व्यक्तीला दिला. त्यामुळे क्रेडिट कार्डवरून तब्बल एक लाख ३२ हजार ८५८ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ४ मार्चला वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली. या प्रकरणी चेतन रवींद्र वाणी (३५, रा. वाल्हेकरवाडी) यांनी चिंचवडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना त्यांना त्यांचे असलेले क्रेडिट कार्ड बंद करायचे होते. त्यासाठी त्यांनी गुगलवर सर्च करत बँकेला फोन लावला. फोनवर असलेल्या व्यक्तीने तो बँकेचा प्रतिनिधी असल्याचा भासवत फिर्यादीला ओटीपी शेअर करण्यास सांगितले. तसेच फिर्यादीच्या क्रेडिट कार्डवरून एक लाख ३२ हजार ८५८ रुपये काढून घेत आर्थिक फसवणूक केली.