घरफोडीप्रकरणी एकास अटक

By admin | Published: February 23, 2017 02:42 AM2017-02-23T02:42:13+5:302017-02-23T02:42:13+5:30

वडगाव शहर व परिसरात सात घरफोडीप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी एकास अटक केली

One arrested for burglary | घरफोडीप्रकरणी एकास अटक

घरफोडीप्रकरणी एकास अटक

Next

वडगाव मावळ : वडगाव शहर व परिसरात सात घरफोडीप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी एकास अटक केली असून १० जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे.
रवी प्रवीण गोरगेल (वय १९, रा. म्ह्तोबानगर, वाकड, मूळ रा. बासुर्ली, ता. रोहा, जि रायगड) यास घरफोडीप्रकरणी अटक करण्यात आली असून त्याचे साक्षीदार असणाऱ्या ९ बालगुन्हेगाराना ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधीत आरोपींनी वडगाव शहरातील केशवनगर, माळीनगर, बाजारपेठ, एमआयडीसी रस्ता तसेच राजपुरी, गभालेवाडी याठिकाणी गेल्या वर्षभरात ७ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून ११ तोळे सोने, ३५० ग्राम चांदी , व दोन मोटारसायकली असा सुमारे साडेचार लाखाचा ऐवज व घरफोडी साठी वापरण्यात येणारे कटर जप्त करण्यात आले आहे. (वार्ताहर)
 पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी स्वत: रेल्वेस्थानक परिसरात एका आरोपीस पकडले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश लोकरे, उपनिरीक्षक आदित्य लोणकर, हवालदार दीपक गायकवाड, चंदू सोनावणे, अमोल ननवरे, अमोल गवारी, सचिन मोरे, विश्वास आबेकर यांनी सर्व आरोपींना मुद्देमालासह पकडले.

Web Title: One arrested for burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.