Pimpri Chinchwad Crime: वेश्या व्यवसायप्रकरणी एकास अटक; दोन महिलांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 14:05 IST2023-11-27T14:04:34+5:302023-11-27T14:05:17+5:30
गुरुवारी (दि. २३) आळंदीजवळील केळगाव हद्दीत ही घटना घडली आहे....

Pimpri Chinchwad Crime: वेश्या व्यवसायप्रकरणी एकास अटक; दोन महिलांची सुटका
आळंदी (पुणे) : केळगाव (ता. खेड) येथे वेश्या व्यवसायप्रकरणी पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने एकाला अटक केली असून, दोन पीडितांची सुटका केली आहे. गुरुवारी (दि. २३) आळंदीजवळील केळगाव हद्दीत ही घटना घडली आहे.
बसवराज सुबन्ना बिरादार (वय ३६, रा. केळगाव, आळंदी) असे अटक आरोपीचे नाव असून, आरोपीवर अनैतिक व्यापार अधिनियम १९५६ कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या आर्थिक फायद्यासाठी पीडितांकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होता. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून दोन पीडितांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्याकडून ७ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.