सॉफ्टवेअर अभियंता अंतरा दास हत्येप्रकरणी एकाला अटक
By admin | Published: December 29, 2016 03:18 PM2016-12-29T15:18:58+5:302016-12-29T15:18:58+5:30
सॉफ्टवेअर अभियंता अंतरा दास हत्येप्रकरणी देहूरोड पोलिसांनी अंतराच्या साफ्टवेअर अभियंता असलेल्या मित्राला बुधवारी रात्री उशीरा अटक केली.
Next
ऑनलाइन लोकमत
पिंपरी चिंचवड, दि. 29 - सॉफ्टवेअर अभियंता अंतरा दास हत्येप्रकरणी देहूरोड पोलिसांनी अंतराच्या साफ्टवेअर अभियंता असलेल्या मित्राला बुधवारी रात्री उशीरा अटक केली. तर, त्याच्या तीन साथीदारांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. संतोष कुमार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संतोष हा मूळचा बिहारचा असून तो बंगळुरुमध्ये आयटी कंपनीत नोकरी करतो.
अंतरा बंगळुरूमध्ये ट्रेनिंगला असताना तिची संतोषशी ओळख झाली होती. तेव्हा पासून तो तिच्या संपर्क होता. तिच्यावर तो एकतर्फी प्रेम करत होता. तसेच तो अंतराला लग्नाची मागणीही केली होती. तिच्या मोबाइवलर संदेश पाठवून लग्न करण्याची मागणी करत होता. मात्र, अंतरा लग्न करण्यास तयार नव्हती. अंतराने वेळोवेळी संतोषचा मोबाईल क्रमांक 'ब्लॉक' केला होता. तसेच अंतरा पुण्यात कुणासोबात फिरत आहे. तिच्यावर लक्ष ठेवण्याचे त्याने मित्रांना सांगितले होते.
अंतरा ही तळवडे येथील कॅपजेमिनी या कंपनीत एप्रिलपासून नोकरी करत होती. नेहमी कंपनीची कॅब घेऊन जाणारी अंतरा 23 डिसेंबर रोजी रात्री तळवडे येथील केएनबी चौकातून पायी जात होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञाताने तिच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार हत्याराने वार केले आणि पसार झाला. अंतरा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यावेळी तेथून जाणा-या सत्येंद्र सिंपी यांनी तिला त्वरित उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.