"खिशात पैसे, खाण्यासाठी अन्न अन् नोकरी नाही, कसं राहू...?", अशी चिठ्ठी लिहत आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 01:21 PM2022-06-11T13:21:54+5:302022-06-11T13:24:39+5:30
थेरगाव येथील केजुदेवी बंधाऱ्यात मृतदेह तरंगत होता...
पिंपरी : ''मी शहरात नोकरीच्या शोधात आलो होतो. मात्र, नोकरी मिळाली नाही. माझ्या खिशात पैसे आणि खाण्यासाठी अन्न नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. मला जवळच असं कोणीच नाही. त्यामुळे मृत्यूनंतर माझा मृतदेह खड्ड्यात फेका, कारण मृत्युनंतर दुःख व्यक्त करायला मला जवळच असं कोणीच नाही, अशी चिठ्ठी लिहून एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ही घटना शुक्रवारी (दि. १०) सकाळी थेरगाव येथे उघडकीस आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश कुमार (रा. केरळ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. मृतदेह शुक्रवारी सकाळी थेरगाव येथील केजुदेवी बंधाऱ्यात मृतदेह तरंगत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबरोबर काढला. पोलिसांनी घटनास्थळी एक चिट्ठी मिळून आली आहे.
पोलिसांनी चिट्ठी जप्त केली आहे. मात्र, ही चिट्ठी सुरेश यानेच लिहिली आहे का, तसेच, यामागे काही घातपात आहे का याबाबत वाकड पोलिस तपास करीत आहेत.