तळेगाव स्टेशन येथील शांतिनाथ जैन मंदिरात एकदिवसीय दीक्षा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:56 PM2018-01-13T13:56:32+5:302018-01-13T13:59:31+5:30

सकल जैन समाजातर्फे एकदिवसीय दीक्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव स्टेशन येथील शांतिनाथ जैन मंदिरामध्ये चि. दर्शनकुमार यांना साधू जीवनाच्या शुभेच्छा देण्यासाठी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

One-Day Diksha Mahotsava at Shantinath Jain Temple at Talegaon Station, Pimpari | तळेगाव स्टेशन येथील शांतिनाथ जैन मंदिरात एकदिवसीय दीक्षा महोत्सव

तळेगाव स्टेशन येथील शांतिनाथ जैन मंदिरात एकदिवसीय दीक्षा महोत्सव

Next
ठळक मुद्देमान्यवरांच्या हस्ते दीक्षार्थी दर्शनकुमार बाफना व प्रवीण बाफना परिवाराचा सत्कारवक्त्यांनी दिल्या आपल्या भाषणातून दीक्षार्थीला साधू जीवनाच्या शुभेच्छा

तळेगाव दाभाडे : येथील सकल जैन समाजातर्फे एकदिवसीय दीक्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव स्टेशन येथील शांतिनाथ जैन मंदिरामध्ये चि. दर्शनकुमार यांना साधू जीवनाच्या शुभेच्छा देण्यासाठी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी मंदिरापासून शोभायात्रेस सुरुवात झाली. स्टेशन परिसरातील मुख्य मार्गावर शोभायात्रा काढण्यात आली. 
या वेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सकल जैन समाजाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते दीक्षार्थी दर्शनकुमार बाफना व   प्रवीणजी बाफना परिवाराचा सत्कार करण्यात आला. 
पदाने आणि संपत्तीने माणूस मोठा होत नाही तर साधनेने आणि तपश्चर्येने होतो. सत्याची साधना करणाऱ्याला आत्मदर्शन होते. आत्मदर्शनातूनच परमात्मा दर्शनाकडे प्रवास सुरू होतो, अशा भावना या वेळी व्यक्त करण्यात आल्या. 
या वेळी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून दीक्षार्थीला साधू जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. सकल जैन समाजाचे अध्यक्ष चंपक गदिया, उपाध्यक्ष महेंद्र हिंगड, विश्वस्त विशाल शहा, नेमीचंद गुंदेशा, प्रकाश पालरेषा, सुभाष राठोड, सचिन राणावत, राकेश गदिया, अशोक हिंगड, दिलीप परमार, सुरेश हिंगड, दिनेश जैन यांच्यासह जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read in English

Web Title: One-Day Diksha Mahotsava at Shantinath Jain Temple at Talegaon Station, Pimpari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.