पिंपरीतील सांगवीत आढळले एक दिवसाच्या चिमुकलीचे मृत अर्भक

By नारायण बडगुजर | Published: August 22, 2022 08:45 PM2022-08-22T20:45:46+5:302022-08-22T20:45:53+5:30

एक दिवसाच्या चिमुकलीची नाळ देखील वाळली नव्हती

One day old infant found dead in Sangvi in Pimpri | पिंपरीतील सांगवीत आढळले एक दिवसाच्या चिमुकलीचे मृत अर्भक

पिंपरीतील सांगवीत आढळले एक दिवसाच्या चिमुकलीचे मृत अर्भक

googlenewsNext

पिंपरी : एक दिवसाच्या चिमुकलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी मृत अर्भक ताब्यात घेऊन शविच्छेदनासाठी पाठवले आहे. ही घटना सोमवारी (दि. २२) दुपारी अडीचच्या सुमारास पिंपळे गुरव येथे उघडकीस आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथे रामकृष्ण मोरे मंगल कार्यालया जवळील मैदानाच्या शेजारी एक दुकान आहे. त्या दुकानाच्या मागील बाजूला सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास स्थानिक नागरिकांना लहान बाळ आढळले. एका नागरिकाने ११२ या हेल्पलाइनवर याबाबत माहिती दिली. त्यानंतर सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्भक ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. एक दिवसाच्या चिमुकलीची नाळ देखील वाळली नव्हती. कोवळ्या चिमुकलीला सोडून दिल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title: One day old infant found dead in Sangvi in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.