सव्वा महिन्यात भरले पवना धरण शंभर टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:25 AM2018-08-11T01:25:56+5:302018-08-11T01:26:00+5:30

पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असणारे मावळ तालुक्यातील पवना धरण महिनाभरात शंभर टक्के भरले

One hundred fifty percent of the wind dam filled in the month | सव्वा महिन्यात भरले पवना धरण शंभर टक्के

सव्वा महिन्यात भरले पवना धरण शंभर टक्के

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असणारे मावळ तालुक्यातील पवना धरण महिनाभरात शंभर टक्के भरले असून, उद्योगनगरीची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मावळातील सर्वच धरणे भरली आहेत. पवना धरण भरले असतानाही कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याचा प्रश्न कायमच आहे. धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
मुळशी, खेड आणि मावळ परिसरात यंदा पावसाचा जोर कायम आहे. मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले. जूनच्या सुरुवातीस पंधरा दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र, सात जुलैपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या चोवीस तासांत पवना धरण परिसरात तीन मि़मी़ पाऊस पडला आहे. तर एक जूनपासून २२२० मि़मी़ पाऊस पडला आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्याने भुशी, वडिवळे, कासारसाई, भामा आसखेड ही धरणे फुल झाली आहेत. लोणावळ्यात जुलै महिन्यात जोरदार पाऊस पडला. अवघ्या पंधरा दिवसांत पावसाने मागील वर्षीची सरासरी गाठली आहे. पवना धरणातील पाणीसाठा नव्वद टक्क्यांच्यापुढे गेल्याने सांडव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे.
धरणातील पाण्याची पातळी ही केवळ वीस दिवसांत वाढली आहे. गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक पाऊस वीस दिवसांत पडल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली आहे. सात जुलैला ३० टक्के असणारे धरणे शंभर टक्क्यांवर पोहोचले आहे. वीस दिवसांत ७० टक्के पाणीसाठा वाढला आहे. २० जुलैपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र धरण परिसरात जोर कायम असल्याने धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.
>धरणातून विसर्ग सुरू
पवनानगर : पिंपरी-चिंचवड व मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १००% भरले आहे. त्यामुळे दोन दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून ८०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग पवना नदी पात्रात शुक्रवारी दुपारी १ वाजल्यापासून सुरू केला आहे. पवना धरण १००% भरल्याने मावळ परिसरातील शेतकऱ्यांसह
पिंपरी-चिंचवड शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी आज अखेर पवना धरण ९८% भरले होते.

Web Title: One hundred fifty percent of the wind dam filled in the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.