Pune: भरधाव ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू, कुदळवाडी परिसरातील अपघात; गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Updated: December 12, 2023 18:25 IST2023-12-12T18:24:55+5:302023-12-12T18:25:25+5:30
याप्रकरणी ट्रकचालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला...

Pune: भरधाव ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू, कुदळवाडी परिसरातील अपघात; गुन्हा दाखल
पिंपरी : भरधाव ट्रकच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. कुदळवाडी येथे रविवारी (दि. १०) सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रकचालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ओमप्रकाश सूर्यानाथ त्रिपाठी (४७, रा. कुदळवाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गौरव ओमप्रकाश त्रिपाठी (१९) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विठ्ठल सोमनाथ हाके (४८, रा. चिंचवड) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव त्रिपाठी यांचे वडील ओमप्रकाश त्रिपाठी हे रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या घराजवळ थांबले होते. त्यावेळी विठ्ठल हाके याने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव चालवून ओमप्रकाश त्रिपाठी यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने ओमप्रकाश यांचा मृत्यू झाला, असे फिर्यादी नमूद आहे. सहायक पोलिस निरीक्षक नकुल न्यामणे तपास करीत आहेत.