पिंपरी-चिंचवमध्ये 'या' मार्गांवर वन-वे, नो-एंट्री; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहरात उपाययोजना

By नारायण बडगुजर | Published: August 8, 2022 11:06 AM2022-08-08T11:06:13+5:302022-08-08T11:08:18+5:30

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून विविध उपाययोजना...

One-way, no-entry on 'these' routes in Pimpri-Chinchav; Measures in the city to break the traffic jam | पिंपरी-चिंचवमध्ये 'या' मार्गांवर वन-वे, नो-एंट्री; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहरात उपाययोजना

पिंपरी-चिंचवमध्ये 'या' मार्गांवर वन-वे, नो-एंट्री; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहरात उपाययोजना

googlenewsNext

पिंपरी : वाहतुकीची समस्या साडेविण्यासाठी पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी विविध मार्गांवर एकेरी वाहतूक, सम-विषम तारखेला पार्किंग, नो एंट्री करण्यात येत आहे. परिणामी काही भागात वाहतूक सुरळीत होऊन वाहन चालकांना व नागरिकांना दिलासा मिळत आहे.

वाहतूक शाखेकडून जानेवारीपासून ठिकठिकाणी हे बदल करण्यात आले. यातील काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर बदल झाले. सकारात्मक परिणाम दिसून आल्यानंतर त्याबाबत अधिसूचना जारी करून बदल कायम करण्यात आले.

नो एंट्री (प्रवेश बंद) झालेले मार्ग

हिंजवडी वाहतूक विभाग

 १) मायकार शोरूम उजवीकडे - डांगे चौकाच्या बाजूस
२) जिंजर हाॅटेल सेवा रस्ता येथून उजवीकडे - हिंजवडीच्या बाजूस
३) डांगे चौकाकडून भूमकर चौक ओलांडल्यानंतर - डाव्या बाजूने मायकार शोरूमकडे

भोसरी वाहतूक विभाग

 १) भोसरी चौक - दिघी मॅगझीन चौक
२) दिघी मॅगझीन चौक - भोसी चौक
३) दापाेडी चौक - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक (दापाेडी गाव)
४ फुगेवाडी चौक - चितळादेवी चौक (पिंपळे गुरव रस्ता)
५) शेरे पंजाब हाॅटेल - कासारवाडी रेल्वे फाटकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर

पिंपरी वाहतूक विभाग

शगून चौक पिंपरी मुख्य बाजारामध्ये तीन चाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंद - भाटनगर चौक

देहूरोड तळेगाव वाहतूक विभाग
 
तळेगाव रेल्वे स्टेशन - जुने पोस्ट ऑफिस

एकेरी वाहतूक (वन वे) झालेले मार्ग

हिंजवडी वाहतूक विभाग

शिवाजी चौक ते विप्रो सर्कल फेज -१ जाॅमेट्रिक सर्कल मेझा ९ चौक - शिवाजी चौक चक्राकार एकेरी वाहतूक

पिंपरी वाहतूक विभाग

विशाल ई-स्क्वेअर थिएटर समोरील रस्त्यावर राॅक्सी हाॅटेल पिंपरी चौक ते विशाल ई स्क्वेअर थिएटर ते मालाश्री पिंपरी स्टेशन रस्त्यापर्यंत

म्हाळुंगे वाहतूक विभाग

 खालुंब्रे ते हुंडाई सर्कल (जोपादेवी जंक्शन) हुंडाई सर्कल - एचपी चौक, चाकळण तळेगाव राज्यमार्ग

वाकड वाहतूक विभाग

 हायवेचे पूर्वेकडील सेवा रस्त्याने सूर्या अंडरपास ते वाकडनाका व सयाजी अंडरपास या सेवा रस्त्याने जाण्यासाठी एकेरी वाहतूक केली आहे.

२५ मार्गांवर जडवाहनांस बंदी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील २५ मार्गांवर जडवाहनांना बंदी करण्यात आली आहे. जडवाहने भर रस्त्यात बंद पडल्यास वाहतुकीचा खोळंबा होतो. बंद वाहने रस्त्यातून हटविण्यास मोठी क्रेन आवश्यक असते. यात किमान एक तास जातो. यावेळी मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे जास्त रहदारी असलेल्या तसेच शहरातील अंतर्गत भागात जडवाहनांना बंदी केली आहे. रात्री किंवा दुपारी काही वेळासाठी अशा वाहनांना या मार्गांवर प्रवेशास परवानगी आहे.

शहरात २४ ठिकाणी सम-विषम पार्किंग

हिंजवडी वाहतूक विभाग

१) शिवाजी चौक, हिंजवडी - विठ्ठल मंदिर, हिंजवडी गावठाण
२) अशोका सोसायटी, ग क्षेत्रीय कार्यालय - तापकीर चौक

सांगवी वाहतूक विभाग

 १) कुणाल आयकाॅन रस्ता - डेली निड्सपर्यंत
२) जुनी सांगवी शितोळे नगर - शितोळे पट्रोलपंपापर्यंत
३) नवी सांगवी कृष्णा बाजार चौक - क्रांती चौकापासून नरसिंह चौकापर्यंत
४) कृष्णा बाजार चौक लागूनच पूर्वेस काॅर्नरपासून - दापोडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूस
५) जगताप डेअरी चौक - विशालनगर चौकापर्यंत
६) शनी मंदिर - क्रांती टी जंक्शन
७) फेमस चौक - साई चौक
८) वैदुवाडी - एम. एस. काटे चौक
९) साई चौक - काटेपुरम चौक
१०) काटेपुरम चौक - रामकृष्ण मंगल कार्यालय
११) ढोरेनगर रस्त्यावर अहल्याबाई होळकर पुतळा - भैया पाटीचा चौकापर्यंत
१२) सारस्वत बॅंक - गणपती चौक दरम्यान

भोसरी वाहतूक विभाग

१) केनेन स्प्रिंग्ज प्रा. लि. कंपनी - स्वामी समर्थ ध्यानयोग केंद्रापर्यंत
२) भोसरी आळंदी चौक - आळंदी रस्ता रखुमाई गार्डन (गवळी गार्डन)

दिघी आळंदी वाहतूक विभाग

प्रभाग क्रमांक ४ बोपखेल गणेशनगर येथील दुर्गा मंदिर काॅलनी क्रमांक १ - काॅलनी क्रमांक १८ पर्यंत

तळवडे वाहतूक विभाग

देहूगाव मुख्य कमान ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक

निगडी वाहतूक विभाग

 १) कुदळवाडी चौक - चेरी स्वीट दरम्यान
२) थरमॅक्स चौक - कृष्णा नगर
३) एचडीएफसी काॅर्नर - शिवशंभो चौकापर्यंत

पिंपरी वाहतूक विभाग
 
पिंपरी कॅम्प बाजारपेठ भाटनगर - शगून चौक

चिंचवड वाहतूक विभाग
 अहिंसा चौक - एसकेएफ चौकापर्यंत एसएकेएफ रस्त्यावर

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ठिकठिकाणी वाहतुकीत बदल केला आहे. काही ठिकाणी त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. आणखी काही बदल करण्यात येणार आहेत. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वाहनचालकांनी सहकार्य करावे.

- आनंद भोईटे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड

Web Title: One-way, no-entry on 'these' routes in Pimpri-Chinchav; Measures in the city to break the traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.