खाद्यपदार्थांना आॅनलाइन मागणी, शहरातील ग्राहकांचा वाढतोय कल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 11:47 PM2018-11-16T23:47:09+5:302018-11-16T23:47:36+5:30

अ‍ॅपद्वारे आॅफर : शहरातील ग्राहकांचाही मिळतोय प्रतिसाद

Online demand for food, the growing trend of customers in the city | खाद्यपदार्थांना आॅनलाइन मागणी, शहरातील ग्राहकांचा वाढतोय कल

खाद्यपदार्थांना आॅनलाइन मागणी, शहरातील ग्राहकांचा वाढतोय कल

Next

पिंपरी : आॅनलाइन खाद्यपदार्थांची सेवा घरपोच देण्यासाठी विविध कंपन्या या व्यवसायात दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांची स्पर्धादेखील वाढलेली आहे. ग्राहकांनी आपल्याच अ‍ॅपद्वारे खाद्यपदार्थ मागवावेत म्हणून वेगवेगळ्या ‘आॅफर’ दिल्या जातात. नागरिकांकडूनही या ‘आॅफर’ला प्रतिसाद मिळत असून, खाद्यपदार्थ आॅनलाइन मागविण्यावर त्यांचा भर आहे.

आॅनलाइन खाद्यपदार्थ सेवा पुरविणाऱ्या विविध कंपन्यांकडून अ‍ॅपमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मागणी केलेल्या खाद्यपदार्थाला किती वेळ लागेल, डिलिव्हरी बॉय हॉटेलमधून निघाला की नाही याची माहिती अ‍ॅपमधून मिळते. डिलिव्हरी बॉय कुठपर्यंत पोहचला आहे, त्याचे लोकेशन अशा विविध सुविधा अ‍ॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अ‍ॅपवरून खाद्यपदार्थाची नोंदणी केल्यानंतर ग्राहकाला त्याचा मोबाइल क्रमांक नोंद करावा लागतो. त्यानंतर ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) उपलब्ध होतो. तो ओटीपी निर्देशित केल्याप्रमाणे नोंद केला की, आपली खाद्यपदार्थाची मागणी नोंद होते अर्थात ‘आॅर्डर’ स्वीकारली जाते. त्यानंतर आपण मागवलेले खाद्यपदार्थ आपल्यापर्यंत पोहेचेपर्यंत त्याचे संपूर्ण लोकेशन कळते. या अ‍ॅपमध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला खाद्यपदार्थ कोणत्या हॉटेलमधून मागवायचे आहेत हे आपण ठरवू शकतो. या सर्व गोष्टींमुळे तरुणाईचा आॅनलाइन खाद्यपदार्थ खरेदीवर भर दिलेला आहे.

या व्यवसायात उतरलेल्या कंपन्या लाखो रुपयांची उलाढाल करीत आहेत. यामुळे हॉटेलमध्येजाणाºयांपेक्षा आॅनलाइन आॅर्डरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हॉटेलमध्ये ‘आॅफर’ नसते. मात्र ‘अ‍ॅप’वर विविध आॅफर दिल्या जातात. त्यामुळे खाद्यपदार्थ आॅनलाइन मागविण्यासाठी ग्राहकांमध्ये स्पर्धा लागली आहे. तरूण अ‍ॅपद्वारे खाद्य पदार्थ मागविण्यासाठी पसंती देत असल्याचे दिसत आहे.

आॅनलाइन खाद्यपदार्थ मागणी वाढली आहे. एका हॉटेलात दिवसभरात ५० ते ६० ‘आॅर्डर’ केल्या जातात. आॅनलाइन खाद्यपदार्थांच्या मागणीमुळे हॉटेलमध्ये बसून खाणाºयांची संख्या कमी होत आहे. आपल्या पसंतीच्या हॉटेलमधून खाद्यपदार्थ आॅनलाइन मागविण्याचा पर्याय या अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध आहे. त्यामुळे संबंधित हॉटेलच्या व्यवसायावर फारसा परिणाम झालेला नाही. - सुनील अग्रवाल, हॉटेल व्यावसायिक

कॉलेजमध्ये असताना आॅनलाइन पदार्थ मागविले की, लवकर येतात. त्यासाठी बाहेर पडून हॉटेलमध्ये जाण्याची गरज पडत नाही. वेळही वाचतो. आपल्याला पाहिजे आहे ते आपण मागवू शकतो. पिझ्झा, बर्गर, पास्ता यावर नेहमी आॅफर असतात. एकावर एक मोफत ही आॅफर तर नेहमीच असते. नोंदविलेली मागणी काही कारणास्तव रद्द केली, तर पैसे परत मिळतात. त्यामुळे खाद्यपदार्थ आम्ही आॅनलाइन मागवतो.
- नीलेश नागरगोजे, महाविद्यालयीन तरुण

 

Web Title: Online demand for food, the growing trend of customers in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.